Green Chilli Price : हिरव्या मिरचीचा दरात तेजी, फळांच्या राजा आंब्याने कोल्हापूर मार्केट बहरले

Kolhapur Market Yard : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पालेभाज्यांपाठोपाठ आता फळभाज्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Green Chilli Price
Green Chilli Priceagrowon
Published on
Updated on

Green Chilli & Mango Rate : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पालेभाज्यांपाठोपाठ आता फळभाज्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या मिरचीची आवक मंदावल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक भागावर बाजार समितीतील मिरचीची आवक अवलंबून असून दिवसाला सौदे दर वाढत आहे.

दोडका, वाग्यांचे दर वाढले असून मेथी, कोथिंबीर दराचा आलेखही चढाच आहे. सध्या बाजारात आवक स्थिर आहे. मात्र, येत्या दिवसांत काही दिवसांत आवक कमी येईल व दर वाढतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

लालभडक टोमॅटोची आवक वाढली तर फळांचा राजा हापूस आंब्याने बाजारात थोडी बहर आलीय. या आठवड्यात आंबा विक्रेत्यांची संख्याही वाढल्याचे दिसून आले.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला टोमॅटो - १५ ते २०, दोडका - ७० ते ८०, वांगी - ५० ते ६०, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची ९० ते १००, फ्लॉवर ३० ते ४०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा २० ते २५, लसूण- १५० ते २००, आले- १०० ते १२०, लिंबू ४०० ते ८०० शेकडा, गाजर ३० ते ४०, बिन्स- ७० ते ८०, गवार -१०० ते १३०, वरणा शेंगा ६० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या पेंढी १० ते १२, मेथी, कोथिंबीर - २० ते २५, शेवगा - ३ रुपयाला १.

Green Chilli Price
Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध १५०, गुलाब १८० ते २००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १५०.

फळे : सफरचंद २५० ते ४००, संत्री १२० ते १३०, मोसंबी ५० ते ८०, डाळिंब १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा - १०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड ५० ते ६०, टरबूज - ४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच १०० ते १४०, अननस -४० ते ५०, बोरे - ५० ते ६०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - ११५ ते १२०, शेंगतेल - १७६ ते १८२, सोयाबीन - ११६ ते १२०, पामतेल - ११० ते ११६, सूर्यफूल - १२० ते १२५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७३ ते ७६, तूरडाळ - १४० ते १५०, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ ८३ ते ८५, चवळी ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोला - १४० ते १६०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com