Pune APMC : कमी दराबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण

APMC Pune : पुणे बाजार समितीत कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असे दलालाला बोलल्यावर चिडलेल्या डमी दलालाने शेतकऱ्याला मारहाण केली. या मारहाणीची व्यथा शेतकऱ्याने माध्यम प्रतिनिधींसमोर कथन केली आहे.
Agricultural Produce Market Committee
Agricultural Produce Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे बाजार समितीत प्रशासनाच्या आशीर्वादाने विनापरवाना व्यापार करणाऱ्या डमी दलाल (चवली दलाल) कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असे दलालाला बोलल्यावर चिडलेल्या डमी दलालाने शेतकऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, मारहाणीची व्यथा शेतकऱ्याने माध्यम प्रतिनिधींसमोर कथन केली. याबाबत बाजार समिती प्रशासन, शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार बाजार समिती आणि पोलिस ठाण्यात दिलेली नाही.

Agricultural Produce Market Committee
Paddy Procurement : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

दरम्यान, केळी विभागात कलिंगडाची चोरी करणाऱ्या चोरांना रोखणाऱ्या शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या धमकीची घटना देखील काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. पुणे बाजार समितीत शेतीमालाची चोरी, शेतीमालाच्या वाहनचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने पार्किंगचे पैसे गोळा करणे, प्रसंगी मारहाण करणे, शेतीमालाच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाणे अशा घटना घडत असतात.

प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी आदिनाथ गायकवाड (रा. करंजी, ता. पाथर्डी) म्हणाले, ‘शुक्रवारी (ता. १) मी १०८ क्रेट्स संत्री विक्रीस आणली होती. मोसंबीच्या दराची माहिती घेत असताना डमी दलाल शेतकऱ्यांकडून कमी दराने माल खरेदी करत असल्याचे बोललो.

Agricultural Produce Market Committee
Jalyukt Shiwar : नांदेडला २५३ गावात होणार जलयुक्तीची कामे

या वेळी डमी अडते सुरेश भोहिने याने राग येऊन माझ्या कमरेत लाथ मारत कानशिलात लगावल्या. मारहाणीमुळे मी यापुढे पुणे बाजार समितीत शेतीमाल विक्रीस आणणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला संचालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती.

हा प्रकार दोन-तीन दिवसांपूर्वी घडला आहे. संबंधित शेतकऱ्याने याबाबत तक्रार केलेली नाही. मात्र, विभाग प्रमुख यांना चौकशी करायला सांगितली आहे. संबंधित डमी आडत्याला बाजार आवारात प्रवेश न देण्याच्या सूचना आहेत.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com