B.B. Thombare : बी. बी. ठोंबरे साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : राज्यपाल बागडे

Governor Haribhau Bagde : साखर कारखानदारीमध्ये श्री. ठोंबरे यांनी सचोटीने काम केल्याने नॅचरल उद्योग समूहाला नफा मिळाला आणि सभासदांना लाभांश दिला गेला, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
B. B. Thombare
B. B. ThombareAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : शासन देखील देशातील साखर कारखानदारीसाठी निर्णय घेताना श्री. बी. बी. ठोंबरे यांचे मार्गदर्शन घेतले जाते. साखर कारखानदारीमध्ये श्री. ठोंबरे यांनी सचोटीने काम केल्याने नॅचरल उद्योग समूहाला नफा मिळाला आणि सभासदांना लाभांश दिला गेला, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

B. B. Thombare
Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी (ता. २८) राज्यपाल श्री. बागडे यांच्या उपस्थितीत २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली. या वेळी राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. नॅचरल उद्योग समूहाचे वतीने कारखान्याचे सभासद मंगलताई किशोरजी डाळे यांना चार लाख रुपयांचा धनादेश राज्यपाल बागडे यांच्या हस्ते २५ टक्के लाभांशापोटी देण्यात आला.

B. B. Thombare
MSP Of Sugar : 'केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ करण्याची शक्यता'

तसेच एन. साई मल्टी स्टेट बँकेच्या सभासदांना १८ टक्के लाभांशापोटी धनादेश देण्यात आले. या वेळी अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, बिभीषण भातलवंडे, सुनील कोचेटा, राजपाल माने, किशोर डाळे उपस्थित होते.

या वेळी नफा-तोटा पत्रकाचे वाचन लेखा परीक्षक सुनील कोचेटा यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक संचालक पांडुरंग आवाड, यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक संभाजीराव रेड्डी यांनी मानले. या वेळी सभेमध्ये कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com