Retirement Felicitation Program : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात सेवानिवृत्तांचा सत्कार

Regional Agricultural Research Centre : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राहिलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम येथील सह्याद्री अतिथी गृह सभागृहात उत्साहात पार पडला.
Retirees Felicitated
Retirees FelicitatedAgrowon
Published on
Updated on

Karjat News : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राहिलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम येथील सह्याद्री अतिथी गृह सभागृहात उत्साहात पार पडला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत होते. व्यासपीठावर भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे, अधिदान व लेखा अधिकारी प्रदीप कदम उपस्थित होते.

Retirees Felicitated
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’बाबत साडेतीनशे शेतकऱ्यांचे आक्षेप

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. भगत म्हणाले, की सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून ऋणनिर्देश करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येत असून त्यात सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मौलिक योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. वाघमोडे म्हणाले, की सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार करणे, हा स्तुत्य उपक्रम आहे. संशोधन केंद्राने विकसित व शिफारशीत केलेल्या विविध भात वाणांत मजूर वर्गाचाही वाटा आहे. या वेळी डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. एस. दळवी, आर. के. कळंबे, ए. सी. सरपोतदार, प्रदीप कदम यांची भाषणे झाली. याप्रसंगी १०२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Retirees Felicitated
Electricity Issue : विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतेत

यानिमित्ताने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी दिलेल्या शुभेच्छा सेवानिवृत्तीधारकांना कळविताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सेवाकाळात तसेच सेवानिवृत्तीनंतर निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री आर. सी. वेटकोळी, किशोर सातकर, दिलीप पाटील, लहू आसोलकर, योगेश आमरे, जितेंद्र कडू, अंगद निर्मळ यांनी परिश्रम घेतले. आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com