Baramati APMC : शेतकरी, श्रमजिवी घटकांसाठी बारामती बाजार समिती कटिबद्ध

Agricultural Support : बारामती बाजार समितीची स्थापना १६ डिसेंबर १९३५ रोजी झाली असून आजवर या संस्थेचे कामकाज पारदर्शक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Baramati APMC
Baramati APMCAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती बाजार समितीची स्थापना १६ डिसेंबर १९३५ रोजी झाली असून आजवर या संस्थेचे कामकाज पारदर्शक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या संस्थेवर एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असूनही सभापती म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. शेतकरी, आडते, खरेदीदार, हमाल-मापाडी व श्रमजिवी घटकांसाठी संस्था सतत कटिबद्ध असून यापुढेही शेतकरी हिताचे काम करीत राहू, असे प्रतिपादन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी केले.

Baramati APMC
Baramati KVK : बारामती कृषी विज्ञान केंद्राला मधमाशी कार्यासाठी पुरस्कार

बारामती बाजार समितीचा ८९ वा वर्धापन दिन किरण तावरे, बाळासाहेब गवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सभापती, संचालक व सचिव तसेच व्यापारी वर्ग आणि सेवक यांची उपस्थिती होती. या वेळी बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, समितीचे संचालक बापुराव कोकरे, सतीश जगताप, विनायक गावडे, दत्तात्रय तावरे, शुभम ठोंबरे, संतोष आटोळे आदी उपस्थित होते.

सुनील पवार महणाले, की बारामती मुख्य आवार तसेच जळोची व सुपे उपबाजार आवारात संस्थेने विविध सोयी-सुविधा पुरविलेल्या असून त्याचा फायदा शेतीमाल खरेदी विक्रीसाठी होत आहे.

Baramati APMC
Baramati Market Committee : बारामती बाजार समिती ई-नाममध्ये राज्यात प्रथम

तसेच नवीन उपबाजारासाठी सुपे व झारगडवाडी येथे समितीने खरेदी केलेल्या जागेत भविष्यात शेतीमाल खरेदी-विक्रीची सुविधा निर्माण करण्याचा समितीचा मानस आहे. समितीने आवारात आधुनिक धान्य ग्रेडिंग युनिट, गांडूळ खत प्रकल्प, गोदाम, रेशीम कोष मार्केट, ई-नाम प्रणाली, इलेक्ट्रॉनिक भुईकाटा, गूळ सेलहॉल, फळे व भाजीपाला विक्री करिता सेलहॉल, जनावरे बाजार, आंबा निर्यात सुविधा केंद्र, पेट्रोल पंप आदी सुविधा उभारल्याने बाजार समितीस गुणांकन पद्धतीत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.

जळोची उपबाजार येथे मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राची उभारणी केली. त्यामध्ये प्रति १०० टनांचे सात कोल्ड स्टोरेज, प्रति १० टनांचे तीन प्रिकूलिंग युनिट, ब्लास्ट फ्रिजर, फ्रोजन फ्रुट आदी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. सचिव अरविंद जगताप यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com