
Nashik News : पिंपळगाव बसवंत येथे मुंबई आग्रा महामार्गालगत बांबूच्या गुदामाला शुक्रवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगडोंबात बांबू, लाकडी पेट्यांसह तीन सिलिंडर भक्ष्यस्थानी आल्याने आगीने अधिकच रौद्ररूप धारण केले.
सिलिंडरच्या जोरदार स्फोटाने परिसर हादरला होता. आगीचे आकाशात उडणारे लोळ पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. सुमारे चार तास चाललेल्या अग्नितांडवात व्यावसायिकांची सुमारे सव्वा दोन कोटींची मालमत्ता भस्मसात झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महामार्गालगत असलेल्या श्रीमान संकुलामागे मोकळ्या जागेत व्यावसायिक आहेत. गोदामासह लाकडी पॅलेट, बॉक्स, फवारणी पंप, पुष्टे पेपर, बांबू, फोटाफ्रेम अशी अकरा दुकाने आहेत. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजाला सुरवात झाली असताना साडे अकराच्या सुमारास महेश भेळभता यांच्या गोदामाच्या मागच्या बाजूला आग लागली.
या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. सिलेंडरच्या टाक्या, लाकडी पेट्या, बांबू, बॅटऱ्या अशा ज्वलनशील वस्तू आगीच्या कवेत आल्याने अग्नीतांडव सुरू झाले. त्यात कडाक्याच्या उन्हाने आग स्फोट होऊन एका पाठोपाठ एक तीन अधिकच भडकली.
तीन सिंलिंडरचे स्फोट झाल्याने आगीचे भीषण रूप दुर्घटनेत दिसले. व्यावसायिकांचे तीन सिलिंडरला आगीचा वेढा पडला होता.अग्निशामक दलाचे तेरा बंबाच्या एकूण १०० हुन अधिक फेऱ्या व ५० हुन अधिक कर्मचाऱ्यांना चार तासानंतर धुमसणार्या आगीवर नियंत्रण मिळविता आले. बँकांचे कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने उभ्या केलेला व्यवसाय डोळ्यांदेखत आगीत भस्मसात होताना पाहून दुर्घटनेची झळ पोचलेल्या व्यावसायिकांना अश्रू अनावर झाले.
आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्करराव बनकर, सतीश मोरे, राजेश पाटील, गणेश बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यावसायिकांना धीर दिला. तर खासदार भास्कर भगरे यांनी प्रशासनाला दिल्ली येथून भ्रमणध्वनीवरून सूचना केल्या. मंडळ अधिकारी सतीश बोडके, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चौधरी, तलाठी राकेश बच्छाव, वृषाली नागोरे यांनी पंचनामा केला.
कचरा जाळला अन घात झाला...
पिंपळगांव शहरातील इतिहासातील सर्वात मोठी आगेची दुर्घटना घडण्या मागचे कारण पुढे आले आहे.परिसरात असलेला कचरा काही व्यावसायिकांकडून पेटविला. कचऱ्याच्या आगीच्या ठिंणग्या लगतच्या लाकडी ठोकल्यावर उडाल्या. तेथेच घात झाला. आणि आगीचा भडका उडून होत्याचे नव्हते केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.