Mixed Cropping: मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार करावा 

Smart Farming: जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा मात्रा द्याव्यात. सुपीकता टिकून ठेवण्यासह उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मिश्र पीक पध्दतीचा अंगीकार करावा. कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत.
Mixed Cropping
Mixed CroppingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांचा मात्रा द्याव्यात.  सुपीकता टिकून ठेवण्यासह उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मिश्र पीक पध्दतीचा अंगीकार करावा. कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. शेतीआधारित उद्योगाद्वारे बचत गटांच्या महिलांनी स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर यांनी केले. 

माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी मंगळवारी (ता. १) महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते.

Mixed Cropping
Mixed Cropping : मिश्रपीक पद्धतीतून शेती झाली किफायतशीर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, गटविकास अधिकारी बापट, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे,

Mixed Cropping
Mix Cropping : सुधारित पीक पद्धतीमुळे साधली आर्थिक प्रगती

जिजामाता उद्यान पुरस्कारप्राप्त मेघा देशमुख, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, तंत्राधिकारी (फलोत्पादन) बाळासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी गावडे म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामुळे परभणीची राज्यभरात ओळख आहे.

कुलगुरू, शास्त्रज्ञानांच्या मार्गदर्शनात शेती करावी. चव्हाण म्हणाले, की हरित क्रांतीमुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली. फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधावी. सामाले म्हणाले, उती, पाने तपासणी प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा. 

डॉ. गडदे म्हणाले, की पेरणीची वेळ अजून गेलेली नाही. ३ ते ४ इंच पाऊस झाल्यानंतर १५ जुलै पर्यंत सोयाबीन पेरणी करता येते. देशमुख म्हणाल्या, पीक पद्धतीत बदल करावा. खांडेकर म्हणाल्या, शेतीपूरक पशुपालन करावे. स्वाती घोडके यांनी सूत्रसंचालन केले.  

राज्य पुरस्कारप्राप्त आणि पीक स्पर्धा विजेत्यांचा सत्कार

पुरस्कारप्राप्त शेतकरी ः राधिका सोमेश्वर गिराम, पांडुरंग जाधव, जनार्दन आवरगंड, ओमकारनाथ शिंदे, मेघा देशमुख, जयश्री मुंडे. पीक स्पर्धेतील विजेते ः मंगेश देशमुख, संतोष मोरे, प्रवीण रोडगे, हरिहर शिंदे, विजमाला देशमुख, रोहिगदास यमलवाड, रामा धोंगडे, मुंजाभाऊ पाटील, ‘अॅग्रोवन’चे जिल्हा बातमीदार माणिक रासवे, भाजीपाला शेतकरी गट यांचा सन्माचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com