
Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज (ता. जत) येथील शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाने शासकीय निधीतील सुमारे ३० लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांची मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली आहे.
चौकशीअंती अपहाराची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१७ मध्ये शाखेत अपहार झाला असून, आठ वर्षांपूर्वीचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील सुमारे ३० लाख रक्कम बाज येथील तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी बँक खात्यावरून स्वतः, इतर नातेवाइकांच्या नावे टाकून अपहार केल्याचा प्रकार शाखा तपासणीत आढळला.
या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक बाज शाखेच्या तपासणीत व्यग्र आहे. अपहार प्रकरणातील नियुक्तीस असलेल्या डफळापूर शाखेचीही तपासणी केली जाणार आहे. यात अपहाराची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या वर्षभरातील व्यवहाराची चौकशी बँकेकडून वारंवार केली जाते. बँकेने त्रयस्थ यंत्रणेकडून लेखापरीक्षण होते. त्याशिवाय अधिकाऱ्यांकडूनही अंतर्गत तपासणी होते. त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी होते. विविध चौकशी पथके असतानाही बँकेत लाखोंचे घोटाळे कसे होतात, असा प्रश्न आहे.
शाखाधिकारी सोलनकर हे शिपाई म्हणून नोकरीस लागले. नंतर ते शाखाधिकारी झाले. त्यांचे वडीलही बँक कर्मचारी होते. सोलनकर यांचा कारभार सतत वादग्रस्त राहिला आहे. यापूर्वीही ते दोन वेळा वादग्रस्त ठरले आहेत.
दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आदेश डावलून ‘ऑन ड्यूटी’ गोवा दौरा केला होता. याप्रकरणी बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती. शाखाधिकाऱ्यांकडून अपहार निदर्शनास आल्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.