
Sangli News : सांगली जिल्हा बँकेस गेल्या आर्थिक वर्षात १८६ कोटींचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, सीईओ शिवाजीराव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन वर्षांपूर्वी सर्व संचालक बँकेत आल्यानंतर पाच वर्षांचे उद्दिष्ट तीन वर्षांत पूर्ण केले.
एकूण व्यवसाय १६ हजार कोटी, तर नेट एनपीए शून्य टक्क्यावर आणल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी संचालक यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले, की शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड वेळेवर केली. बँकेच्या पारदर्शी कारभारावर विश्वास ठेवून ठेवी वाढल्या. बँक पुन्हा एकदा एकरकमी कर्जफेड सवलत योजना राबवण्यासाठी नव्याने प्रस्ताव देत आहे.
आर्थिक वर्षात एक हजार, तर तीन वर्षांत दोन हजार ४१ कोटींनी ठेवी वाढल्या. आज ८ हजार ८९७ कोटी ठेवी आहेत. तीन वर्षांपूर्वी ७.८१ टक्के नेट एनपीएवरून तीन वर्षांतच शून्यावर आणला. ग्रॉस एनपीए १४. ३४ टक्क्यांवरून ७.५३ टक्क्यांवर आणला. तो पुढील वर्षी चार टक्क्यांच्या आत आणू, तीन वर्षांत भागभांडवल २९ कोटी वाढून १९१ कोटी झाले.
२९१ कोटी ठेवी वाढल्या. तीन वर्षांत कर्जामध्ये २०४१ कोटी वाढून सध्या ७०९६ कोटींचे कर्ज वाटप आहे. सध्याची गुंतवणूक ३ हजार ६२५ कोटी, राखीव निधी ९७४ कोटी आहे. सध्याची एनपीए रक्कम ५३४ कोटी आहे. येत्या वर्षापासून पशुपालकांना खेळते भांडवली तीन लाखाचे कर्ज बिनव्याजी दिले जाईल.''
अध्यक्ष नाईक म्हणाले, की बँकेच्या २१८ शाखांपैकी १२४ शाखांनी सर्व उद्दिष्टपूर्ती केली. ४६ शाखांनी ९५ टक्के तर ९० टक्क्यांवर ३१ शाखा आहेत. २०१ शाखांनी ९० टक्क्यांची उद्दिष्टपूर्ती केली आहे. शंभर टक्के वसुली करणाऱ्या विकास सोसायट्यांना प्रत्येकी २० हजार ते ७० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल.
पुढे बोलताना अध्यक्ष नाईक म्हणाले, की बँकेचे शतकमहोत्सवी वर्ष २८ मार्च २०२६ पासून सुरू होतेय. त्या वर्षात १० हजार कोटींच्या ठेवी, तर ८ हजार कोटी कर्ज वाटप, ग्रॉस एनपीए २ टक्क्यांच्या आत आणि नफा २२५ ते २५० कोटी रुपये उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण, महिला बचत गटांना ताकद देण्याचे धोरण राहील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.