
Beed News: तरुण कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम करावे, स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवावी, चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालायचे नाही. जिल्ह्यातील वाळू, राख माफीयागिरी मोडीत काढून जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर न्यायचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
बुधवारी (ता. २) युवा संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. या प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, बाळासाहेब आजबे, डॉ. योगेश क्षीरसागर आदी त्यांच्या समवेत होते. बळीराम गवते यांच्या पुढाकाराने युवा संवाद मेळावा झाला.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शेख निजाम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार म्हणाले, की बीड ही संत महंतांची भूमी आहे. सीतेच्या अपहरणावेळी रावण आणि जटायू यांच्यातील लढाईही बीडच्याच भूमीत झाल्याने रावणासारख्या अपप्रवृत्तींना रोखण्याची ताकद जिल्ह्याच्या मातीत आहे. बीडच्या बदनामी करणाऱ्या गोष्टी थांबायला हव्यात.
जातीजातींमधील अंतर कमी व्हायला हवे, यासाठी बळीराम गवते यांच्या नेतृत्वाखाली युवक आघाडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेताना त्यांचे रेकॉर्ड तपासा, असे आवाहन करत रात्री आपणही पोलिस अधीक्षकांकडून अनेकांच्या रेकॉर्डची माहिती घेतल्याचे अजित पवार म्हणाले. चुकीच्या गोष्टीची किंमत पक्षश्रेष्ठींना मोजावी लागते. आपण दहा-दहा लाखांच्या कामांचे तुकडे करणार नाही, कार्यकर्त्यांनीही आता बदल स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माजी मंत्री धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित होते. त्याबाबत आजारपणामुळे मुंडे नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. विमानतळ उभारणीमुळे औद्योगिक विकास लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख कारखान्याची १०० टक्के ऊसतोडणी हार्वेस्टरने हेाते. आपल्या भागातील मुलांनाही प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले जाईल. बीडमध्ये टाटासोबत इनक्युबेशन सेंटर, तारांगण उभारणार आहे. विमानतळ उभारणीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.