Jayakwadi Dam Backwater : असंपादित क्षेत्रात जायकवाडीच्या बॅक वॉटरचे पाणी

Farmer Jalsamadhi Protest : गंगापूर तालुक्यातील अमळनेर, लखमापूर, गळनिंब येथील अनेक शेतकऱ्यांच्या मालकी हक्क असलेल्या ७/१२च्या असंपादित शेतात जायकवाडी धरण फुगवटा क्षेत्रांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकात शिरते.
Jayakwadi Dam Backwater
Jayakwadi Dam BackwaterAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जायकवाडी बॅक वाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी असंपादीत जमिनीतील शेती पिकात येत असल्याने चांगले पिके उध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेती पिकांना केलेला खर्च देखील निघत नसल्याची स्थिती आहे.

गंगापूर तालुक्यातील अमळनेर, लखमापूर, गळनिंब येथील अनेक शेतकऱ्यांच्या मालकी हक्क असलेल्या ७/१२च्या असंपादित शेतात जायकवाडी धरण फुगवटा क्षेत्रांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकात शिरते.

Jayakwadi Dam Backwater
Rain Crop Damage: पिके पाण्यात, शेतकरी तणावात

त्यामुळे त्यांचे हातातोंडाशी आलेले ऊस, कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका इतर पिके पाण्याखाली जातात.त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा शेतीला केलेला खर्च निघत नाही. सहा सात महिने त्या शेतात पाणीच असते, पाणी ओसरल्यानंतर एक दोन महिने शेत ओलाव्याने ओलेचिंब असते.

शेती मशागतीस काही कालावधी मिळाल्यानंतर पुन्हा जिद्दीने कष्टाने ने पीक उभे केले तर पुन्हा जायकवाडी बॅक वाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी येते. त्यामुळे वर्षभर शेती कामातच येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या पाण्यात जाणाऱ्या चांगल्या सुपीक जमिनी शासन प्रशासनाने चालू बाजार भावा प्रमाणे भूसंपादन करून आम्हाला न्याय द्यावा, तसेच आम्हाला मूलभूत नागरी सेवा सुविधा देऊन उपरोक्त करावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Jayakwadi Dam Backwater
Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

शेतकरी आंदोलनाच्या तयारीत...

सततच्या नुकसानीने आर्थिक गणित कोलमडून कर्जबाजारी झालेले धरणग्रस्त त्रस्त शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन व शासनाकडे प्रलंबित मागण्यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत मात्र ‘‘सरकारी काम अनेक वर्षे थांब’’च्या वेळकाढूपणा आणि दफ्तर दिरंगाईने शासकीय दरबारी पायपीट करून मेटाकुटीला आले आहेत.

आता संतप्त होऊन पिकांच्या नुकसान भरपाईसाठी व शेत जमिनी भूसंपादन करण्यासाठी तातडीने संयुक्त मोजणी नकाशा करण्यासाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तीन गावातील असंख्य शेतकरी, महिला पुरुषांसह लहान मुले सोबत घेऊन अमळनेर (ता. गंगापूर) येथे पुराच्या पाण्यात जलसमाधी आंदोलनचा पवित्रा घेतला आहे.

ज्या ज्यावेळेस धरण भरले. तेव्हा आमच्या असंपादित शेती पिकात आले. त्यामुळे आमच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होते. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २०२२ व २०२४ मध्ये जलसमाधी आंदोलन केले. आता आमच्या प्रलंबित मागण्या ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत मान्य न झाल्यास सर्व बाधित शेतकरी कुटुंब महिला, लहान मुलांसोबत ४ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार.
- इसा आमीनखा पठाण, त्रस्त शेतकरी, अमळनेर
भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी फीस भरण्यासाठी जलसंपदा विभाग पत्र देणार आहे, त्यांनी ऑनलाइन तारीख दिल्यानंतर मोजणी होईल. शेतकऱ्यांनी आवर्जून त्या दिवशी हजर राहावे.
- नेहा धुळे, शाखा अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग गंगापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com