Bachchu Kadu Protest : बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे; राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन

Farmer Karjmafi : कार्यकर्त्यांशी चर्चा करून शनिवारी निर्णय जाहीर करू अशी भूमिका कडू यांनी घेतली होती. तोवर उपोषण सुरूच राहील, असंही सांगितलं होतं. शनिवारी मंत्री सामंत यांनी कडू यांची भेटी घेतली. भेटी दरम्यान चर्चा केली. त्यानंतर कडू यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
Bachchu Kadu
Bachchu KaduAgrowon
Published on
Updated on

Minister Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी आज (ता.१४) अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे. तसेच उद्याचा चक्काजाम आंदोलनही रद्द केलं आहे. परंतु राज्य सरकारने मागण्या मान्य करत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.

यावेळी राज्य सरकारने बच्चू कडू यांना पाठवलेलं पत्र मंत्री सामंत यांनी वाचून दाखवलं. "शेतकरी आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी पुढील १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल. तसेच सक्तीची कर्जवसूली स्थगिती आणि नवीन कर्जासाठी तातडीने बैठक लावू. दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी ३० जूनच्या अधिवेशनात पुरवण्या मागणीत तरतूद करू. तसेच विविध मागण्यांसाठी त्या-त्या विभागाच्या मंत्र्यांशी बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील." असं पत्रात लिहिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केल्याचं बच्चू कडू म्हणाले. "दिव्यांगांच्या बाबतीत आपण २५ मागण्या केल्या होत्या त्यापैकी २० मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत. आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंतीदिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू," अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केलं.

Bachchu Kadu
Maharashtra Election 2024 : शेतकरी, शेतमजूर ही आमची ताकद : बच्चू कडू

मागील सहा दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं मोझरी येथे अन्नत्याग उपोषण सुरू होतं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून शनिवारी निर्णय जाहीर करू अशी भूमिका कडू यांनी जाहीर करत उपोषण सुरूच राहील, असं सांगितलं होतं. शनिवारी मंत्री सामंत यांनी कडू यांची भेटी घेतली. भेटी दरम्यान चर्चा केली. त्यानंतर कडू यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com