Leopard Conservation : बिबट्यासाठी ‘येडगाव’ची दहा एकर जागा निश्‍चित

Leopard Facility : पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाने येथे बिबट्याची सुविधा वाढविण्याची योजना आखली आहे. यासाठी विभागाने येडगाव धरणाच्या पूर्वेकडील १० एकर जागा निश्‍चित केली आहे.
Leopard
LeopardAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाने येथे बिबट्याची सुविधा वाढविण्याची योजना आखली आहे. यासाठी विभागाने येडगाव धरणाच्या पूर्वेकडील १० एकर जागा निश्‍चित केली आहे.

संबंधित जमीन पाटबंधारे विभागाच्या मालकीची असल्याने, वन विभागाकडून त्यांना एक कोटी २७ लाख रुपये देऊन लवकरच या जमिनीचा ताबा मिळेल, असे पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले.

Leopard
Leopard Attack : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा

श्री. प्रवीण म्हणाले, ‘‘सध्या माणिकडोह येथे बिबट्या बचाव केंद्र आहे. त्याचे व्यवस्थापन वाइल्ड लाइफ एसओएस या स्वयंसेवी संस्थेद्वारे व्यवस्थापित केले जाते. याची क्षमता ४० बिबट्यांची आहे. ती क्षमता आता ओलांडली आहे.

Leopard
Junnar Leopard Attack : बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा

त्यामुळे सध्या काहींना माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात ठेवले आहे. त्यामुळे नव्या निवाऱ्याची गरज आहे. हा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे परवानगीसाठी पाठविला जाईल. पुढील वर्षापासून ही सुविधा कार्यान्वित होईल.’’

‘‘चार प्रकारचे बिबटे येथे आहेत. यामध्ये वृद्ध, शिकार करण्याला असमर्थ असलेले, जमावाच्या हल्ल्यात गंभीर दुखापतीमुळे अपंग झालेले, मनुष्याकरवी संगोपन केलेले, अनाथ वाढलेले आणि दीर्घकाळ तेथेच राहिलेले असे प्रकार आहेत. यामध्ये २००९ पूर्वी सुटका करण्यात आलेली पिले आणि ज्यांवर गंभीर हल्ल्यानंतर त्यांना येथे आणले गेले आहे, अशांचा समावेश आहे,’’ असे श्री. प्रवीण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com