Agriculture Water : पिकांना अधिक पाणी देणे टाळा : डॉ. जी. एम. वाघमारे

Dr. G.M. Waghmare : फळझाडांना व भाजीपाला पिकास अधिक पाणी उपलब्ध आहे म्हणून आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी देणे टाळावे, असा सल्ला डॉ. जी. एम. वाघमारे यांनी दिला.
Dr. G.M. Waghmare
Dr. G.M. WaghmareAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : तापमान वाढल्यास बाष्पोरजनाची प्रक्रिया जोरात होते. त्यामुळे झाडास पाण्याची आवश्यकता अधिक प्रमाणात भासते. तापमान वाढल्यास वाऱ्याचा वेग वाढतो. चक्रीय वादळ निर्माण होते. झाडातील व जमिनीतील पाणी कमी होते. अशा वेळेस फळझाडांना व भाजीपाला पिकास अधिक पाणी उपलब्ध आहे म्हणून आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी देणे टाळावे, असा सल्ला डॉ. जी. एम. वाघमारे यांनी दिला.

स्थानिक पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात ९७ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम सोमवारी (ता. १) पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. वाघमारे बोलत होते. विषय विशेषज्ञ पशू व दुग्धशास्त्र डॉ. ए. एस. जिंतुरकर यांनी दुष्काळ सदृश परिस्थितीत पशुधन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा. जी. बी. यादव, प्रा. ए. डी. निर्वळ, शिवा काजळे यांची उपस्थिती होती.

Dr. G.M. Waghmare
Marathwada Water Storage : नऊ मध्यम प्रकल्पांत केवळ २८ टक्के पाणीसाठा

डॉ. वाघमारे म्हणाले, की पाण्याच्या पाळ्याचे अंतर आवश्यकतेनुसारच ठेवावे. थंडीमध्ये आठ दिवसांचे व उन्हाळ्यामध्ये सहा दिवसांचे अंतर ठेवावे. पिकास प्लॅस्टिक अथवा सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.

Dr. G.M. Waghmare
Agriculture Irrigation : शेतीसाठी जिहे-कठापूरचे आवर्तन सुरू करा

अशी घ्या जनावरांची काळजी...

डॉ. जिंतुरकर म्हणाल्या, उन्हाळ्यात जनावरांना दिवसभर लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करुन ३ ते ४ वेळा द्यावा. चाऱ्याची नासाडी कमी करण्यासाठी चारा कुट्टीचा वापर करावा. चारा कुट्टी न करता दिल्यास चाऱ्याची ३३ टक्के नासाडी होते. हिरवा चारा, वाळलेला चारा याचे मिश्रण करून गूळ व मिठाच्या पाण्याचे द्रावण शिंपडावे. तसेच प्रति जनावरांना शरीराच्या वजनानुसार २० ते ५० ग्रम खाण्याचा सोडा द्यावा.

घामावाटे सोडिअम, क्लोराईड क्षार कमी होत असल्याने प्रति जनावरांना दररोज शरीराच्या वजनानुसार २५ ते ५० ग्रॅम आयोडीनयुक्त मीठ द्यावे. दुधाळ जनावरांच्या आहारात ताक, गूळ, मीठ, क्षार दररोज द्यावे. प्रामुख्याने जनावरास उसाचे वाढे, वाळलेले ऊस एकूण चाऱ्याच्या ३० टक्के पेक्षा अधिक प्रमाणात देऊ नये. ऊस कुट्टीवर १ टक्का चुन्याची निवळी शिंपडून मगच पशूंना खायला द्यावे. पशूंना उष्माघाताचा त्रास होत असल्याने पशूंना गोठ्यात खिडक्यांना ओले बारदाने लावावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com