
Nanded News : नांदेड जिल्ह्यात एक जून ते २० जुलैपर्यंत हजेरी लावणारा पाऊस याही वर्षी आजपर्यंत पडणाऱ्या सरासरी ३४२.५५ मिलीमीटरनुसार १०६.७३ टक्के पाऊस झाला आहे. परंतु हा पाऊस मात्र जिल्ह्याच्या माहूर, बिलोली, हदगाव, भोकर या तालुक्यात प्रमाण कमी आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधीक पाऊस मुखेड, धर्माबाद, मुदखेड, लोहा, कंधार या तालुक्यात झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात सर्वाधीक पाऊस जंगल भाग असलेल्या माहूर तालुक्यात १०१६.७० मिलिमीटर व किनवट तालुक्यात १०२६.५८ मिलिमीटर पडतो. दरम्यान चालूवर्षी भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला.
यानुसार जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे आगमन झाले. परंतु काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी जिल्ह्यातील प्रकल्पांत मात्र जलसाठा वाढला नाही.
५० दिवसात ३४२.५० मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात (ता. १) जून ते २० जुले या पन्नास दिवसात ३२०.९० मिलिमीटर पाऊस पडतो. या तुलनेत आजवर ३४२.५० मिलीमीटरनुसार १०६.७३ टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वात कमी माहूर तालुक्यात ३४७.१० मिलिमीटर (७९.३४ टक्के), बिलोली ३९२.१० मिलिमीटर (६६ टक्के), हदगाव २७४.९० मिलिमीटर (७६.२३ टक्के), भोकर २९८.८० मिलिमीटर (८५.७ टक्के) पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे मुखेड तालुक्यात सर्वाधीक ३६८.९० मिलिमीटर (१३९.३७ टक्के), धर्माबाद ३८४.२० मिलिमीटर (१३१.५८), लोहा ३४४.३० (१३१.४१ टक्के), धर्माबाद ४१७.१० (१३१.०७ टक्के).
जूनमध्ये पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत झालेला पाऊस (पाऊस मिलीमीटरमध्ये)
तालुका पडणारा पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी
नांदेड २९७.१० ३२०.८० १०७.९८
बिलोली ३१८.१० ३९२.८० ६६.००
मुखेड २६४.७० ३६८.९० १३९.३७
कंधार २८६.५० ३५६.९० १२४.३७
लोहा २६२.०० ३४४.३० १३१.४१
हदगाव ३६०.६० २७४.९० ७६.२३
भोकर ३४८.६० २९८.८० ८५.७१
देगलूर २८३.७० २७९.६० ९८.५५
किनवट १९९.१० २०२.०२ १०१.००
मुदखेड ३१०.६० ३५९.५० ११५.७४
हिमायतनगर ३४७.६० ३२१.१० ९२.३५
माहूर ४३७.५० ३४७.१० ७९.३७
धर्माबाद ३०४.३० ४१७.१० १३७.०७
उमरी २९०.४० २९०.८० १००.१४
अर्धापूर २९२.०० ३८४.२० १३१.५८
नायगाव २२४.३० २४१.३० १०७.५०
एकूण ३२०.९० ३४२.५५ १०६.७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.