Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Maharashtra Election 2024 : जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांत १९६ जागांसाठी सरासरी ६७.९७ टक्के मतदान झाले. गत २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यात तब्बल ५.९१ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.
Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघांत १९६ जागांसाठी सरासरी ६७.९७ टक्के मतदान झाले. गत २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यात तब्बल ५.९१ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदार संघांपैकी तब्बल १४ ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली. तर निफाडमध्ये दोन टक्क्यांची घट झाली. मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते अन् कुणाला धोकादायक ठरते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) सकाळी सातपासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नांदगाव, येवल्यातील वाद वगळता इतरत्र शांततेत मतदान पार पडले. सकाळी मतदानाची गती संथ होती तर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला.

मतदानाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहिल्याने मतदान यंत्रे जमा करण्यासाठी केंद्रप्रमुखांना मध्यरात्र झाली, रात्री उशिरा प्राप्त झालेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान झाले.

Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

यंदा मतदानात ५.९१ टक्क्यांनी वाढ झाल्याने आता जिल्ह्यातील निकालात उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. चांदवड-देवळ्यात चौरंगी लढत झालेली असताना मतदानाच्या टक्केवारीत ७.८८ टक्के वाढ झाल्याने आता उमेदवार विजयाचा अंदाज लागणे अधिक कठीण झाले आहे.

नाशिक पश्चिम मतदार संघातही उत्सुकता निर्माण झाली असून, येथील तिरंगी लढतीबरोबर वाढलेले मतदान कुणाचे समीकरण बिघडविणार, याकडे लक्ष लागले आहे. बंडखोरी झालेल्या देवळालीत तब्बल ८.५९ टक्के मतदान वाढले आहे.

मालेगाव बाह्य, कळवण-सुरगाणा, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, दिंडोरी पेठ, देवळाली, मालेगाव मध्य, बागलाण, चांदवड-देवळा, नांदगाव व इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तर निफाडमध्ये दोन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मालेगाव बाह्यमध्ये सर्वाधिक वाढ, तर बागलाणमध्ये सर्वाधिक घट झाली. आजी-माजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघांत मतदानात वाढ दिसून आली.

यंदाच्या निवडणुकीत वाढलेली मतदानाची टक्केवारी ही प्रस्थापितांना धक्का देणारी तर परिवर्तनाची लाट समजली जाते. येवला व मालेगाव बाह्य या दोन्ही मतदार संघांत मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ या दोघांचेही ‘टेन्शन’ वाढले; तर दिंडोरीत ८.९६ टक्क्यांनी मतदान वाढल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याही चिंतेत भर पडली आहे.

Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

येवल्यात दिसला ‘जरांगे फॅक्टर’

मंत्री छगन भुजबळांविरुद्ध आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या संघर्षामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या येवला मतदार संघाच्या निवडणुकीत प्रथमच ऐतिहासिक मतदान झाले. अनेक गावांनी ८० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, तालुक्यात विक्रमी सरासरी ७५ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे आजपर्यंत नोंद झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. येथे महायुतीचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. माणिकराव शिंदे यांच्यात चुरशीचा सामना होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी केलेली धारदार टीका, तर मनोज जरांगे पाटील यांनीही मतदार संघात संवाद साधत केलेले आवाहन यामुळे या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधले होते.

निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ दिसून आला असून, ग्रामीण भागात हाच मुद्दा गावोगावी चर्चेत दिसून आला. मराठा, ओबीसी व मुस्लिम समाज एकवटल्याने टक्केवारी वाढली, तर मराठाबहुल गावात मतदानाची टक्केवारी ७८ ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com