Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Voting Percentage : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत विविध मतदार संघात यंदा अपेक्षित मतदान झाले.
Haryana Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत विविध मतदार संघात यंदा अपेक्षित मतदान झाले. काही ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला. परिणामी, आता उद्या (ता.२३) होत असलेल्या निकालातून कुणाचे भाग्य खुलते याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

या तीन जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघ आहेत. या जागांसाठी महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी तसेच काही ठिकाणी परिवर्तन महाशक्ती, अशा विविध आघाड्यांचे उमेदवार रिंगणात होते. यंदा सर्वच मतदार संघांमध्ये अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. त्यातही विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Haryana Assembly Elections 2024
Sangli Assembly Election : सांगलीत चुरशीने मतदान

प्रामुख्याने अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर (भाजप), अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप), बाळापूर नितीन देशमुख (उबाठा शिवसेना), मूर्तिजापूर हरीश पिंपळे (भाजप), वाशीम जिल्ह्यात अमित झनक (काँग्रेस), भावना गवळी (शिवसेना), बुलडाण्यात चिखलीमध्ये श्‍वेता महाले (भाजप), सिंदखेडराजा डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), मेहकर डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना), बुलडाणा संजय गायकवाड (शिवसेना), खामगाव आकाश पुंडकर (भाजप), जळगाव जामोद डॉ. संजय कुटे (भाजप), मलकापूर राजेश एकडे (काँग्रेस) हे आमदार यावेळीही रिंगणात उतरलेले आहेत.

यापैकी सर्वजण आपापल्या विजयाची खात्री देत आहेत. मात्र, मतदारांच्या मनात नेमका कुणाला कौल दिला गेला हे शनिवारी (ता.२३) दुपारी स्पष्ट होईल. या प्रत्येक आमदारांना विरोधी उमेदवाराने तगडी लढत दिलेली आहे. कुठल्याही मतदार संघात एकतर्फी विजयाची शक्यता नाही. विशेषतः मतदानाची टक्केवारी वाढल्याने महायुतीकडे कल राहू शकतो, असाही एक राजकीय क्षेत्रात अंदाज दिला जात आहे.

Haryana Assembly Elections 2024
Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

मतांचे ध्रुवीकरण अधिक प्रमाणात झाल्याने आश्‍चर्यकारक निकाल येतील असे विरोधक स्पष्ट सांगत आहेत. अकोला जिल्ह्यात काँग्रेसचे दोनही उमेदवार विजयी होतील, असे या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. बुलडाण्यात यावेळी काँग्रेस चार ठिकाणी बाजी मारू शकतो असा दावा होत आहे.

वाशीम जिल्ह्यातही काँग्रेस एक, राष्‍ट्रवादी (शरद पवार) एक आणि शिवसेना उबाठा एक असा निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय नेते व पक्षांकडून होत असलेले दावे कितपत खरे ठरले हे निकालानंतर स्पष्ट होईल.

जिल्हानिहाय झालेले मतदान टक्केवारी

अकोला ६४.९८ टक्के, बुलडाणा ७०.३२ टक्के, वाशीम ६६.०१ टक्के.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com