Soil Nutrient: जमिनीतील अन्नद्रव्यांचे उपलब्धीकरण

Soil Microbes: जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट आणि वनस्पतीला गरजेप्रमाणे अन्नद्रव्ये पुरविणारा गट असे दोन प्रकारचे जिवाणूंचे गट असतात. यापैकी सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट जमिनीला सुपीकता देतो, दर दुसरा गट पिकाला पोषण देतो.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Soil Health: अन्नद्रव्यांच्या उपलब्धीकरणाचे काम जमिनीत पिकाच्या केशमुळांभोवताली असणाऱ्या सूक्ष्मजीवांकडून केले जाते. वनस्पती आपल्या मुळातून स्राव सोडतात. या स्रावातून सूक्ष्मजीवांना पाहिजे असलेल्या अन्नद्रव्यासंबंधी संदेश जातात. हे स्राव म्हणजे पाहिजे असलेली अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांचे खाद्य असते. यातून नेमके गरज असणारे सूक्ष्मजीव कार्यरत होतात. किती अन्नद्रव्ये उपलब्ध करून पाहिजेत याचाही संदेश जातो.

तितके अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी किती सूक्ष्मजीवांची गरज आहे, नेमके तितकीच संख्या सूक्ष्मजीव वाढवितात. गरजेइतकेच अन्नद्रव्य स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात आणतात आणि परत सुप्तावस्थेत जातात. या विशिष्ट तंत्रामुळे वनस्पतींना संतुलित पोषण मिळू शकते. उपलब्धीकरणासाठी सूक्ष्मजीवांना सेंद्रिय कर्बाची गरज असते, तसेच त्यासाठी योग्य आर्द्रता, सामू, तापमान, क्षारता व प्राणवायू म्हणजे हवा योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते.

इथे सूक्ष्मजीवशास्त्राचा एक नियम चिंतन करण्यासारखा आहे. निसर्गात कोणताच जिवाणू कार्यक्षम नसतो. जिवाणू अधिक तो काम करीत असलेली पारिस्थितिकीशी (वरील वेगवेगळे घटक) समन्वय झाला तरच कार्यक्षमता प्रकट करू शकते. प्रत्येक अन्नद्रव्यासाठी यासाठीच निसर्गात कित्येक जाती प्रजातींच्या जिवाणूंची उपलब्धता केलेली असते. कोणी नेमके काम पार पाडायचे हे पारिस्थितिकी ठरविते. हे काम आपल्या विचारशक्तीच्या पलीकडचे आहे. अशा परिस्थितीत शेतकरी म्हणून आपल्या हातात असणारे घटक जितके योग्य ठेवणे शक्य आहे तितके ठेवावेत, बाकी निसर्गावर सोपवावे.

Agriculture
Soil Health: जमिनीच्या आरोग्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज

सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा

पानात तयार होणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी ७० ते ७५ टक्के अन्नद्रव्ये वनस्पती मुळातून स्रावावाटे या अन्नपुरवठा करणाऱ्या जिवाणूंच्या जीवन कार्यासाठी सोडते. शास्त्र सांगते, की मुळातील स्राव फक्त गरजेचे खत कोणत्या जिवाणूंच्या गटाने उपलब्ध करून द्यावयाचे त्यांना कार्यान्वित करण्यापुरते असते. बाकी पुढील काम पार पाडण्यासाठी त्यांना जमिनीतील सेंद्रिय कर्बावरच अवलंबून राहावे लागते. पानात तयार होणाऱ्या एकूण अन्नद्रव्यांपैकी मुळातील स्रावातून एकूण ३३ टक्के भाग खर्च होतो. ३३ टक्के वनस्पतीच्या विविध शरीर क्रियेसाठी तर शिल्लक ३३ टक्के शरीर वाढीसाठी वापरले जाते. वेगवेगळ्या वाढीचे अवस्थेत गरजेप्रमाणे यात फरक पडू शकतो.

भू-सूक्ष्मजीवशास्त्र सांगते, की वनस्पतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन स्थिरीकरण-उपलब्धीकरण या मार्गानेच चालते. परंतु प्रचलित शेती शास्त्रात हे मान्य केलेले नाही. प्रचलित शास्त्र सांगते, की रासायनिक खत दिल्यानंतर त्यातील अन्नद्रव्ये उपलब्ध अवस्थेत राहतात. वनस्पती गरजेप्रमाणे त्यातील भाग खात असते. उपलब्ध साठा पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत असतो. विरघळणारा म्हणजे एखाददिवशी दिवस रात्र भरपूर पाऊस झाला, अगर सऱ्या भरभरून पाणी पाजले तर निचऱ्यावाटे बहुतेक साठा वाहून जाईल. परंतु तसे होत नाही. त्या वेळी असणाऱ्या गरजे इतकाच उपलब्ध असतो. तितकाच नाश पावतो. बाकी स्थिर साठ्यात सुरक्षित राहतो. म्हणून १० ते १२ दिवसांच्या महापुरात बुडालेल्या जमिनीत पूर उतरून गेल्यावर वापसा मिळताच तणे आणि पीक वाढू लागते. जमिनीत स्थिर साठा खूप मोठा असतो. हा उपलब्ध साठा हा त्या वेळच्या गरजेइतकाच असतो.

आता स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण ही रचना मान्य केली तर माती परीक्षणातून खतमात्रा हे तंत्र चुकीचे ठरते. आपण उपलब्ध अन्नद्रव्याचा साठा मोजतो. जमिनीतून किती मिळेल आणि बाहेरून किती देणे गरजेचे आहे, याची गणिते करून शिफारस करतो. जमिनीत कोणतेही पीक नसता उन्हाळ्यात ज्या वेळी माती नमुना घेतला जातो, त्या वेळी उपलब्ध अन्नद्रव्ये असण्याची कोणतीच गरज नसते. अशा वेळी उपलब्ध अन्नद्रव्ये मोजून जमिनीतून किती उपलब्ध होणार हे कसे काय समजू शकते? एकूण अन्नद्रव्यांचा साठा मोजणे गरजेचे आहे. परंतु शास्त्रात हा विषय रसायनशास्त्र विभागाकडून हाताळला जातो. अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय रसायनशास्त्रीय धरला गेला आहे. वास्तविक हा विषय रसायनशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या दोन विज्ञानशाखांनी एकत्रित हाताळणे गरजेचे आहे.

Agriculture
Soil Ploughing: शेतजमीन नांगरणी कधी करावी?

नांगरणीची आपली परंपरा पिढ्यान् पिढ्या हजारो वर्षांची आहे. ती पूर्ण चुकीची होती असे म्हणण्याचा येथे उद्देश नाही. त्या परिस्थितीत ते एकदम बरोबरच होतो. यामुळे विना नांगरणीवर सामान्य शेतकऱ्यांचा सहजासहजी विश्‍वास बसत नाही. काळ बदलेल तसे शेती करण्याच्या पद्धतीत बदल होत गेले पाहिजेत. परंपरेच्या विरुद्ध म्हणजे चुकीचे असे म्हणू नका. हा काळानुरूप झालेला बदल आहे. अभ्यास करा, प्रथम थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून खात्री करून घ्या आणि मग पुढे जा. शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी द्या, चर्चा करा. यातून जमीन सुपीकतेच्या दिशेने पावले टाकावीत.

अन्नद्रव्यांच्या स्थिरीकरणाची पायरी

रासायनिक खते जोपर्यंत पोत्यात आहेत, तोपर्यंत ती रसायन शास्त्रीय आहेत. जमिनीत दिल्यानंतर पुढे सूक्ष्मजीवशास्त्राला सुरुवात होते. माती परीक्षणातून फक्त एखादे अन्नद्रव्य किती द्यावे इतकी शिफारस केली जाते. अन्नद्रव्य दिले म्हणजे ते पिकाला मिळाले असे होत नाही. शेतकऱ्यांनी खत दिल्यानंतर त्यातील जास्तीत जास्त भाग पिकापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची काय तयारी केली पाहिजे यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

आज रासायनिक खते फक्त १८ ते २० टक्केच वापरली जात आहे. त्यात वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी स्थिरीकरण ही पहिली पायरी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. प्रत्येक जमिनीची एक ठरावीक स्थिरीकरण मर्यादा असते. ती वापरून कमी होते, तर प्रयत्नपूर्वक मूळ पदावर शेतकऱ्यांनी आणणे गरजेचे असते. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट आणि वनस्पतीला गरजेप्रमाणे अन्नद्रव्ये पुरविणारा गट असे दोन प्रकारचे जिवाणूंचे गट असतात. यामध्ये यांपैकी सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट जमिनीला सुपीकता देतो, दर दुसरा गट पिकाला पोषण देतो.

पहिल्या गटाचे खाद्य कुजणारा पदार्थ तर दुसऱ्या गटाचे खाद्य सेंद्रिय पदार्थ कुजून तयार झालेले खत. जैविक स्थिरीकरण खताचा हप्ता देत असता जमिनीत जर कुजण्याची क्रिया चालू असेल तर त्यातच होते. आपण कुजणारा पदार्थ जमिनीत कधीच देत नाही. फुकट मिळणारा हा घटक (धसकटे) पैसे खर्च करून गोळा करून बाहेर फेकून देतो अगर जाळून टाकतो. त्यातही कुजण्यास जड असणारा पदार्थ असेल तर जास्त चांगले. भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाने ही गोष्ट लक्षात आल्यावर मी १९९० पासून चांगले कुजलेले खत जमिनीत मिसळणे बंद केले. वेगवेगळे प्रयोग करीत २००५ पासून पूर्वमशागत पूर्ण बंद आणि आंतर मशागत फक्त अत्यावश्यक गरजेपुरती करू लागलो.

- प्रताप चिपळूणकर ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com