Soil Ploughing: शेतजमीन नांगरणी कधी करावी?

बियांचे अंकुरण, पिकाच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमीन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली केली जाते. खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.

पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान गेले कि १५ सेटीमीटर खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग,  किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे.आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याच प्रमाण वाढल आहे. नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आहे असं समजाव. तर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगल आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच प्रमाण तपासणं आवश्यक आहे. पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही तर जमीन जर नांगरलेली असेल तर अशा जमिनीत पाणी खोलवर जिरतं, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. नांगरणी नेहमी उताराला आडवी करावी. कारण उताराला जर समांतर नांगरणी केली तर पावसाचं पाणी जमिनीत न मुरता वाहून जात. दरवर्षी नांगरणी न करता तीन चार वर्षातून  एकदा जमीन मोठ्या पलटी नांगराने नांगरावी. त्यामुळे पाणी मुरण्यासाठी, मातीची जडणघडण सुधारण्यासाठी, किडींचे कोष वर येण्यासाठी आणि तणाचं बी जमिनीखाली खोल जाऊन कुजण्यासाठी मदत होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com