Weather Stations : कृषी महाविद्यालयाच्या हवामान केंद्रात घडताहेत तज्ज्ञ

Climate Change : हवामानात होणाऱ्या बदलांमुळे भारतीय हवामान विभागाप्रमाणे पुणे कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Agriculture College Pune
Agriculture College Pune Agrowon

Agriculture College Pune : विद्यार्थ्यांना हवामानाचा अभ्यास करता यावा या उद्देशाने पुणे कृषी महाविद्यालयात १९८७ मध्ये हवामान विभाग स्थापन करण्यात आला. या विभागामधून आतापर्यंत एमएस्सीचे १६१ व पीएचडीचे १५ असे एकूण १७६ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत या विभागाची सुरुवात करण्यात आली. या विभागामध्ये सुरुवातीच्या काळात पहिले प्राध्यापक म्हणून प्रा. एम. सी. वार्ष्णेय यांनी काम पाहिले. त्याच कालावधीमध्ये यूएनडीपी व एफएओअंतर्गत हवामान शास्त्रातील अद्ययावत उपकरणे उपलब्ध करण्यात आली. त्याच दरम्यान विद्यापीठातील प्राध्यापकांना संबंधित प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले गेले. त्यानंतर अमेरिकेतील २० शास्त्रज्ञांनी विभागात येऊन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.

Agriculture College Pune
Climate Change : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीय माहिती महत्त्वाची

सुरुवातीच्या काळामध्ये क्रॉप मॉडेलिंगवर पीक प्रारूपे काम करण्यात आले. या विभागांतर्गत हवामानाचे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी वेधशाळा उपलब्ध करून देण्यात आली.

या वेधशाळेमध्ये पर्जन्यमापक यंत्र, बाष्पीभवन मोजण्यासाठीचे यंत्र, दिशादर्शक यंत्र, हवेचा वेग मोजण्याचे यंत्र, तापमापक, सूर्यप्रकाशाचे तास मोजण्यासाठीचे कॅम्पेबल स्ट्रोक्स, सनशाईन रेकॉर्डर, जमिनीचे तापमान मोजण्याचे सॉइल थर्मामीटर अशी विविध उपकरणे आहेत. त्याचा फायदा आजही विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिकाचा अनुभव घेण्यासाठी होत आहे.

केंद्रामार्फत दर मंगळवारी व शुक्रवारी भारतीय हवामान विभागाच्या हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी कृषी संदेश दिले जातात. गारपीट, अवकाळी पाऊस यांचेही अंदाज शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे दिला जातो.

सध्या केंद्रामार्फत पुणे जिल्ह्यात ग्रामीण कृषी मौसम सेवा या प्रकल्पांतर्गत तालुकानिहाय १४ व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे साधारणपणे ३ हजार शेतकऱ्यांना हवामान विषयक संदेश पाठविले जातात. सध्या सहायक विभागप्रमुख म्हणून डॉ. विजय स्थूल हे काम पाहत आहेत. त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन आहे.

Agriculture College Pune
Climate Change : हवामान बदलास अनुकूल तंत्र अभ्यासा

५९१ प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण

विभागांतर्गत राष्ट्रीय पातळीवरे हवामान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम १९९८ पासून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आर्थिक साह्याने घेतला जातो. यामध्ये प्रामुख्याने २५ सहायक प्राध्यापकांची २१ दिवसांची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. आजवर ३१ प्रशिक्षणे पूर्ण झाली असून, त्यातून ५९१ प्रशिक्षणार्थिंना हवामानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना अॅपवर माहिती

शेतकरी जागरूकता कार्यक्रमांतर्गत भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या दामिनी अॅपवर वीज पडण्याबाबतची पूर्वसूचना दिली जाते. तसेच मेघदूत या अॅपवर हवामानाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज व मागील १० दिवसांचे हवामान व पीक नियोजन याविषयी माहिती दिली जाते.

- डॉ. विजय स्थूल, ९४२१०६७९९४

हवामान विभाग प्रमुख, पुणे कृषी महाविद्यालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com