

Amaravati News : पांढरी वरून शहानूर प्रकल्पाकडे जाताना साधारणता तीन किलोमीटर पार केल्यावर उजवीकडे असणाऱ्या एका कालव्याचा शेतीला लागून असलेला भाग एका शेतकऱ्याने कोरल्याचे उघड झाल्यामुळे कालव्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कृतीवर पाटबंधारे विभाग काय कारवाई करते, याकडे इतरांचे लक्ष लागले आहे.
शाहनूर धरणाच्या निर्मितीनंतर शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अंतर्गत उजवा व डावा असे कालवे तयार करण्यात आले आहे. सदरचे कालवे तयार करताना अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे कुठे मध्यभागातून तर कुठे शेताच्या काठावरून कालवे पुढे गेल्याने शेत जमिनीचे तुकडे पडले आहेत.
अशावेळी शेतकऱ्यांना शेतात पीक लागवडीकरिता पाण्यासारखी अतिमहत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली असताना मात्र कमी जागेअभावी उत्पादन घेण्यास अडचण निर्माण झाली आहे. अशातच पांढरी ते शहानूर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. सदरचे बांधकाम करताना हद्दीतील जागेत शेतकऱ्यांच्या शेतीच्या धुऱ्यालगत काढण्यात आलेल्या नालीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
समोर मोठी नाली तर मागच्या बाजूला कॅनल या दोघांच्या मधात शिल्लक असलेल्या शेत जमिनीच्या तुकड्यावर शेती करणे, त्यातून उत्पादन घेणे यासाठी शेतकऱ्यांना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतात आत शिरण्याच्या सुरुवातीलाच असणाऱ्या या मोठ्या नालीमुळे होत असलेली अडचण दूर करण्यासाठी एका शेतकऱ्याने लगतच्या कॅनलच्या एका बाजूच्या भागाची माती काढून ती नाली बुजवण्याचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. सदरचा भाग कोरल्यामुळे कालव्यावरील रस्ता अरुंद झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.