Asvali Dam : ‘अस्वली’चे पाणी १९ पाड्यांना

Har Ghar Jal Scheme : अस्वली धरणाच्या पाण्याचा वापर करून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १८ गावांतील १९ पाड्यांतील लोकवस्तीसाठी पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे.
Dam Water
Dam Wateragrowon

Bordi News : अस्वली धरणाच्या पाण्याचा वापर करून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १८ गावांतील १९ पाड्यांतील लोकवस्तीसाठी पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या १८ गावांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने जलपुरवठा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेसाठी १०४ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपये खर्च येणार असून केंद्र सरकार ५१ कोटी २७ लाख ३९ हजार रुपये; तर राज्य सरकार ५१ कोटी २७ लाख ३९ हजार रुपये या योजनेसाठी मंजूर केले आहेत.

Dam Water
Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या प्रचारासाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने लघू पाटबंधारे खात्याला या योजनेसाठी अस्वली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य तो सहकार्य करण्याबाबत पत्र दिले आहे. या योजनेचे काम मुंबईतील आर. ए. घुले या कंत्राटदाराला मंजूर झाले असून भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

Dam Water
Har Ghar Jal Mission : ‘हर घर जल’ योजनेबाबत संभ्रम

ही योजना २६ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करावयाची असून नवीन २१ जलकुंभ बांधण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. अस्वली व १८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका डहाणू असे या योजनेचे नाव आहे. तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर गावांतील ४१,२२३ लोकवस्तीला दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या धरणातून बोर्डी, झाई-बोरीगाव व घोलवड या तीन ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पाण्याचा साठा कमी असल्यामुळे या तीन गावांची तहान अद्यापही भागलेली नाही. म्हणून या तीन ग्रामपंचायत परिसरात नवीन जलकुंभ बांधण्याचे काम सुरू असून लवकरच नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामालाही वेग येईल, असे पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अस्वली धरणात पुरेसा पाण्याचा साठा असून वाढीव योजनेसाठी या धरणाचा पाणी वापरण्यात येईल.
- गणेश गायकवाड, उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com