Loksabha Election Training : सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे

IAS Kumar Ashirwad : लोकसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा.
IAS Kumar Ashirwad
IAS Kumar AshirwadAgrowon
Published on
Updated on

Solapur News : लोकसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे या वेळी उपस्थित होते.

IAS Kumar Ashirwad
IAS Kumar Ashirwad : ‘शासन आपल्या दारी’साठी यंत्रणांनी जबाबदारी पार पाडावी

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडे नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण त्वरित पूर्ण करण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून त्यानुसार प्रशिक्षण द्यावे. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लागत असल्याने अशा कर्मचाऱ्यांना लहान लहान गटात चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रशिक्षण द्यावे.

IAS Kumar Ashirwad
IAS Kumar Ashirwad : महसूल, पोलीस विभागाने परस्पर समन्वय ठेवावा

तसेच या निवडणूक कर्मचाऱ्यांना हँड्स ऑन प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएम मशिन हाताळण्याबाबतचे प्रशिक्षणही उत्कृष्टपणे द्यावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना ईव्हीएम मशिन योग्य प्रकारे हाताळणे शक्य होईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. कोणत्याही शासकीय योजना संबंधी बॅनर्स, पोस्टर व अन्य ठिकाणी राजकीय नेत्यांचे नावे, फोटो असतील, तर ते काढून घ्यावेत. जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमात राजकीय व्यक्ती सहभागी होत असतील तर अशा कार्यक्रमासाठी सिंगल विंडो येथून परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

१८ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी

उपजिल्हाधिकारी निवडणूक निऱ्हाळी यांनी स्वीप ॲक्टिव्हिटी अंतर्गत सात मे २०२४ पर्यंत मतदार जनजागृती करता येईल, अशी माहिती दिली. तर १८ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू राहील. त्याप्रमाणेच स्ट्राँग रूम, मतदान केंद्रावरील सुविधा, पेंटिंग ऑफ बूथ, रूट प्लॅन, कंट्रोल रूम सेटअप तसेच जिल्हास्तरावरील कंट्रोल रूमचा टोल फ्री नंबर १९५० असल्याची माहिती देऊन निवडणूक प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशिन उपलब्ध करून देणे, या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com