Dam Water Stock : धरणांत नव्याने येवा सुरू

Rain Update : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
Dam stock
Dam stockAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सोमवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणांत नव्याने ४.६४ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात २६ धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. मागील तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ७ जूनपर्यंत धरणांत १५.६३ टीएमसी म्हणजेच ७ टक्के पाणी शिल्लक राहिले होते. त्यानंतर गुरुवारपासून जोरदार पावसास सुरुवात झाली. शनिवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणांत नव्याने २.६६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली. पुढील काही दिवस असाच पाऊस राहिल्यास धरणांत आणखी पाण्याची आवक वाढेल अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला आहे.

Dam stock
Water Dam Stock : रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

यंदा जून महिन्यात जवळपास दहा दिवस पाऊस नसल्याने धरणांनी चांगलाच तळ गाठला होता. काही धरणे कोरडी पडली होती. परंतु सहा जूनपासून पावसास पोषक वातावरण तयार झाल्याने पावसाने बऱ्यापैकी जोर धरला. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवस धरणांत पाण्याची आवक झालेली नव्हती. परंतु सात जूनपासून धरणांत नवीन पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे.

एक जूनपासून घोड धरणक्षेत्रात सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस पडला. भाटघर धरणक्षेत्रात १३१ मिलिमीटर, नाझरे १२७, टेमघर ८९, खडकवासला ९३, वरसगाव ६५, पानशेत ६२ मिलिमीटर पाऊस बरसला. विसापूर ८४, उजनी ७८, वीर ८४, नीरा देवघर ६१ मिलिमीटर पाऊस पडला. धरणांत १० रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ०.८१ टीएमसी एवढा येवा दाखल झाला होता. त्यामुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

Dam stock
Dam Water Stock : ‘मांजरा’त केवळ एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक

सध्या पश्चिम पट्ट्यात दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यत अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळला. यात प्रामुख्याने मुठा खोऱ्यातील टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २५ मिलिमीटर पाऊस पडला असून वरसगाव, टेमघर, खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, कळमोडी ३५, नाझरे ४६, माणिकडोह २६, वडज १५, घोड ४९, विसापूर ६० पाऊस पडला. तर इतर धरणक्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १५.४० टीएमसीपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे.

या धरणांत सुरू झाली पाण्याची आवक :

खडकवासला, आंध्रा, वीर, भाटघर, पिंपळगाव जोगे, येडगाव, उजनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com