
Yavatmal News : दारव्हा तालुक्यातील अनेक गांवामध्ये सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या कीडीने संपूर्ण पीक पोखरल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहचा प्रश्न उभा ठाकला आहे.
त्याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले.
तालुक्यातील खूबगाव, तळेगाव, लोही, शेंद्री, पाळोदीसह तालुक्यातील अनेक गांवामध्ये हुमणी अळीने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे प्रचंड नासाडी केली. कीटकनाशक फवारूनसुद्धा हुमणी अळी नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सोयाबीनचे पीक हुमणी अळीमुळे हातचे गेल्यामुळे कुटुंबासाठी आर्थिक तरतूद कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.
त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाअंतर्गत पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत शासनाने द्यावी, जेणेकरून दुसऱ्या पिकाचे लागवडी करणे सोईचे होईल. या प्रमुख मागणीसह सरकार विरोधात आंदोलन, मोर्चे, उपोषण करू नये यासाठी जन सुरक्षा विधेयकासारखे गंभीर विधेयक मंजूर करून घेतले आहे.
विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक सरकारने तातडीने रद्द करून जनतेला शासनाच्या चुकांविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य द्यावे, कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, शेतीमालाच्या किमतीत वाढ करावी, बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या किमती कमी कराव्यात या मागण्यांचा देखील निवेदनात समावेश करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, शहर अध्यक्ष राजेंद्र घाटे, अतुल राऊत, ॲड. मनोज कावळे, पंढरीनाथ सिहे, अजय ठाकरे, डॉ. दिलीप मिरासे, सनी आगळे, गुणवंतराव वानखडे, बाबाराव राऊत, अक्षय डोंगरे, नवेद खान, पवन कटके, अशोक बोरचाटे, कैलास साबळे, अमोल राऊत, बबलू भोयर, वसंतराव सवाई, गोविंदराव इंदाने, करण राठोड, रवींद्र गायनर, नंदकिशोर महल्ले, गोविंद नवरंगे, दादारावजी डोंगरे, सचिन नवरंगे, सुनील पवणे, सुरेश नरवडे, किसनराव मोहाडे, संदीप सिहे, रामभाऊ ठाकरे, अमोल जटाळे, विजय गोकुळे, मोहन देशमुख, हेमंत भोयर, दिनेश देशमुख, सुरेंद्र महल्ले, सचिन बांबल, गणेश जाधव, प्रज्वल गावंडे, मनोहर खाडे, नितीन कावळे, सतीश बागल उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.