Joint Agresco : सहा वाणांसह पाच कृषी यंत्रे, ८९ तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

MPKV Rahuri : या बैठकीत विद्यापीठाच्या सहा वाणांसह पाच कृषी यंत्रे आणि ८९ तंत्रज्ञान शिफारशीला मान्यता मिळाली आहे.
MPKV Rahuri
MPKV RahuriAgrowon
Published on
Updated on

Nagar News : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५२ व्या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डंका वाजला आहे. या बैठकीत विद्यापीठाच्या सहा वाणांसह पाच कृषी यंत्रे आणि ८९ तंत्रज्ञान शिफारशीला मान्यता मिळाली आहे.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कृषी परिषदेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद उपस्थित होते.

MPKV Rahuri
Joint Agresco : ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये पीकवाण, यंत्र, शिफारशींवर सांगोपांग चर्चा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीपिके वाण प्रसारण व शेतीपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यांतर्गत या कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली.

प्रसारित वाणांची वैशिष्टे

- भात ः (व्हीडीएन-१८०८)*: भाताचा व्हीडीएन -१८०८ हा वाण अधिक धान्य उत्पादन देणारा, गरवा व लांबट बारीक दाण्याचा वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

- ऊस ः फुले ऊस १५००६ (एम एस १६०८१) : फुले ऊस १५००६ हा अधिक ऊस व साखर उत्पादन देणारा, मध्यम कालावधीत पक्व होणारा व न लोळणारा वाण महाराष्ट्र राज्यात सुरू, पूर्व हंगाम आणि आडसाली लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

- दुधी भोपळा ः फुले गौरव (आर.एच.आर.बी.जी.-५४) : दुधी भोपळ्याचा फुले गौरव (आर. एच. आर. बी. जी. -५४) हा दंडगोलाकार, हिरव्या रंगाची फळे असणारा आणि अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

- दोडका ः फुले किरण (आर.एच.आर.आर.जी.एच.-३) : दोडक्याचा फुले किरण (आर. एच. आर. आर. जी. एच. -३) हा सरळ, कोवळी हिरवी फळे असणारा आणि अधिक उत्पादन देणारा संकरीत वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.

MPKV Rahuri
Join Agresco : अडीचशे उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी, २० पीकवाण, ८ यंत्र-अवजारांना मान्यता

कांदा ः फुले स्वामी (आर.एच.आर.ओ.आर.-१२) : कांद्याचा फुले स्वामी (आर.एच.आर.ओ.आर.-१२) आकर्षक फिक्कट लाल रंगाचा, गोलाकार, अधिक उत्पादन देणारा आणि साठवणुकीसाठी उत्तम असणारा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला.

- टोमॅटो ः फुले सूर्या (आर.एच.आर.टी.एच.- ३x५)*: संकरित टोमॅटोचा, फुले सूर्या (आर. एच. आर. टी. एच.-३x५) हा मध्यम वाढीचा, अंडाकृती, जाड सालीची टणक फळे, लायकोपिनचे चांगले प्रमाण असणारा आणि अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला.

- फुले भेंडी प्लकर : भेंडी तोडणीसाठी हस्तचलित फुले भेंडी प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले.

- फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र : मक्याची कणसे सोलून दाणे वेगळे करण्यासाठी विद्युतमोटर चलित फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले.

- फुले अंजीर प्लकर : अंजीर फळांची तोडणी करण्यासाठी मनुष्यचलित फुले अंजीर प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले.

- फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र : आजारी जनावरांना सहजपणे उचलून उपचार करण्यासाठी फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र प्रसारित करण्यात आले.

- फुले गूळ घोटणी यंत्र : गूळ बनवताना घोटणी करणे आणि गुळाच्या ढेपा बनविण्यासाठी विद्युत मोटर चलित फुले गूळ घोटणी यंत्र प्रसारित करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी या वर्षी शेतकऱ्यांसाठी विविध पिकांचे सहा वाण, पाच कृषी यंत्रे-अवजारे आणि ८९ कृषी तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित करण्यात आल्या आहे. या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील.
डॉ पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com