Joint Agresco : ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये पीकवाण, यंत्र, शिफारशींवर सांगोपांग चर्चा

PDKV Akola : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीनदिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापिठांचे शास्त्रज्ञ, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तज्ज्ञ दाखल झालेले आहेत.
Joint Agresco
Joint AgrescoAgrowon
Published on
Updated on

Akola News : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवारपासून (ता. ७) सुरू असलेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या ५२ व्या बैठकीत गेल्या दोन दिवसांत विविध तांत्रिक सत्रांमध्ये पीकवाण, यंत्र, तंत्रज्ञानविषयक शिफारशींवर शास्त्रज्ञांमध्ये विचारमंथन झाले. याचे अंतिम निष्कर्ष लवकरच येणार आहेत. आज (ता. ९) या बैठकीचे सूप वाजणार आहे.

Joint Agresco
Okra Variety : ‘‘वनामकृवि’चे केळी, भेंडी’चे वाण ‘जॉइंट अॅग्रोस्को’मध्ये’

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीनदिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापिठांचे शास्त्रज्ञ, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तज्ज्ञ दाखल झालेले आहेत. शुक्रवारी उद्घाटन सोहळ्यानंतर तांत्रिक सत्रांना सुरुवात झाली होती.

Joint Agresco
Joint Agresco 2024 : अकोल्यात आजपासून ‘जॉइंट अॅग्रोस्को’चे आयोजन

शनिवारी विषयनिहाय चर्चा झाली. यात प्रामुख्याने विविध पिके, त्यामध्ये सुधारणा, धोरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, फलोत्पादन, प्राणी विज्ञान आणि मत्स्य व्यवसाय, मूलभूत विज्ञान, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान, वनस्पती संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, समाज विज्ञान, बागायती पिके, जैविक आणि अजैविक ताण अशा विविध विषयांवर विविध गटांमध्ये चर्चा झाली.

या वर्षी प्रसारणासाठी २१ पीकवाण, १२ अवजारे व यंत्रे आणि २६९ उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी बैठकीसमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. या तांत्रिक बैठकांना ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील (राहुरी), कुलगुरू डॉ. संजय भावे (दापोली), कुलगुरू डॉ. इंद्रमणी (परभणी) या चारही कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक व इतर विभागप्रमुख उपस्थित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com