
Mumbai News: बारामती आणि परळी येथे नव्याने पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी १३४३ कोटी, ७४ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.
या निधीतून प्रगत संशोधन केंद्रे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि आधुनिक सुविधा उभारल्या जातील. या दोन्ही महाविद्यालयांसाठी बांधकाम, वेतन व आनुषंगिक बाबींसाठी प्रत्येकी ६७१ कोटी, ७७ लाख, ९३ हजार रुपये खर्चाच्या तरतुदींसही मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील परळी येथे ७५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर बारामती तालुक्यातील महाविद्यालयासाठी कऱ्हावागज येथे ८२ एकरची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ८० विद्यार्थी असणार आहे.
या दोन्ही महाविद्यालयांसाठी प्रत्येकी २७६ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये शिक्षक संवर्गातील ९६, शिक्षकेतर संवर्गातील १३८ तर बाह्यस्त्रोताद्वारे भरावयाच्या शिक्षकेतर संवर्गातील ४२ पदांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयांसाठी प्रत्येकी मनुष्यबळ वेतन व कार्यालयीन खर्चासाठी पुढील पाच वर्षांसाठी १०७ कोटी, १९ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
त्याचबरोबर महाविद्यालय इमारत, उपकरणे, यंत्र सामग्री व आनुषंगिक बाबी खरेदी करणे, वाहन खरेदी, शेड बाह्य पाणीपुरवठा, विहीर, विंधन विहीर आदी बाबींच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
श्रेय नेमके कोणत्या मुंडेंचे?
परळी हा मतदारसंघ पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे नेमके श्रेय कोणत्या मुंडे यांचे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
‘कृषिक-२०२५’ मधील घोषणा महिन्यात अमलात
जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यांत परळी येथे नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महिनाभरातच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या प्रस्तावांना मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.