
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे गुरुवार (ता. २९) ते शनिवार (ता.३१) या कालावधीत आयोजित चार कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये (जॉइंट ॲग्रिकल्चर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कमिटी मीटिग ः जॉइंट अॅग्रेस्को) राज्यातील कृषी विद्यापीठाचे शेतीपिकांचे १४ वाण, फळपिकांचे ६ वाण आणि भाजीपाल्याचे २ वाण, १८ कृषी यंत्रे-अवजारांसह २२५ सुधारित तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांमध्ये प्रसारणाकरिता मंजूर करण्यात आल्या. त्यात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित ५ वाणांची नोंद घेण्यात आली.
शेती पिकांचे वाण....
‘जॉइंट अॅग्रेस्को’ मध्ये शेती पिकांच्या १५ वाणांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावर सखोल चर्चा झाल्यानंतर त्यापैकी १४ नवीन वाण लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या ५ वाणांची नोंद घेण्यात आली. सोयाबीनच्या फुले प्रशांत (केडीएस ११८८) हा वाण चारकोल रॉट, तांबेरा रोगास बळी पडणारा असल्याने समितीने या वाणास मान्यता नाकारली. या वाणाची कमी ‘ट्रीपसीन इनहीबीटर’ या अपोषक घटकासाठी स्रोत म्हणून नोंदणीची सूचना केली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी ः
१. रब्बी ज्वारी : परभणी सुपर दगडी (एसपीव्ही २७३५)ः राज्यस्तरीय व स्थानिक तुल्यबळ वाणांपेक्षा धान्य व कडब्याच्या उत्पादनात सरस आहे. खोडमाशी, खोडकिडा, खडखड्या रोगास मध्यम सहनशील आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारस.
२. चवळी : परभणी पद्मा (सीपीबी २२०१)ः लवकर परिपक्व होणारा, अधिक उत्पादन देणारा, पिवळा केवडा रोगास प्रतिकारक्षम आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागात खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस.
३. तीळ (टीएलटी ७) : हा वाण पांढरा व टपोरा, अधिक बिया व तेल उत्पादन देणारा आहे. फायलोडी व बोंड पोखरणारी अळी यासाठी सहनशील आहे. महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस.
४. तीळ (टीएलटी १९) : राष्ट्रीय पातळीवर प्रसारित हा वाण तेलंगणा राज्यासाठी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामासाठी प्रसारित करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
१. रब्बी ज्वारी : पीडीकेव्ही शाश्वत (एकेएसव्ही ४६१ आर) ः अधिक धान्य व कडबा उत्पादन देणारा सरळ वाण आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्याची शिफारस.
२. नाचणी : पीडीकेव्ही आदिश्री (बीएफएम ८ ई))ः लवकर परिपक्व होणारा, अधिक धान्य उत्पादन देणारा, प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक वाण आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी शिफारस.
३. उन्हाळी मूग : पीडीकेव्ही फाल्गुनी (टीएकेएसएम १४०) ः अधिक उत्पादन देणारा, टपोरा, चकाकी असलेला, एकाच वेळी परिपक्व होणारा आहे. पिवळा विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे. खरीप व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस.
४. मूग : पीडीकेव्ही वर्षा (टीएकेएम १४१)ः अधिक उत्पादन देणारा, शेंड्यावर शेंगा लागणारा, न तडकणारा, पिवळा विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे. खरीप हंगामात संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
५. हरभरा : पीडीकेव्ही काबुली ५ (एकेजीके १८०२) ः अधिक उत्पादन देणारा, टपोरे दाणे, लवकर परिपक्व होणारा, यांत्रिकी पद्धतीने काढणीस योग्य आहे. मर रोगास प्रतिकारक आहे. रब्बी हंगामात ओलिताखाली लागवडीसाठी महाराष्ट्रात प्रसारित करण्याची शिफारस.
६. जवस : पीडीकेव्ही शारदा (पीडीकेव्ही एनएल ३७१) ः अधिक उत्पादन व तेलाचे प्रमाण असणारा आहे. मर रोग, गादमाशीसाठी मध्यम प्रतिकारक आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारस.
७. गहू : (एकेडब्ल्यू ५१००) ः राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यासाठी बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणीकरिता प्रसारित वाणाची नोंद घेण्यात आली.
८. मका : संकरित वाण पीडीकेव्ही -आरंभ (बीएमएच१८-२) ः राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलगंणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान या राज्यात रब्बी हंगामाकरिता प्रसारित करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली.
९. ज्वारी : ( सिएसव्ही ६५ येलो)ः राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यासाठी प्रसारित करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
१. भात : फुले मावळ ८ (व्हिडीएन २००३) ः अधिक धान्य उत्पादन देणारा, हळवा व लांबट बारीक दाण्याचा आहे. खरीप हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
२. बाजरी : फुले मुक्ताई (डीएचबीएच २१०७५) ः हा संकरित वाण अधिक उत्पादन देणारा, गोसावी व करपा रोगास प्रतिकारक्षम आहे. खरीप हंगामात महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
३. कारळ : फुले कळसूबाई (आयजीपीएन १८३४) ः अधिक उत्पादनक्षम, भुरी मूळ व खोड कुजव्या रोगास प्रतिकारक्षम आहे. खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस.
४. गहू : फुले शाश्वत (एनआयएडब्लू ४११४) ः राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात बागायती क्षेत्रात उशिरा पेरणीकरिता प्रसारित करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
१. भात : ट्रॉम्बे कोकण महान (टीकेआर ३५): अधिक उत्पादन देणारा, मध्यम उंचीचा, गरवा, लांबट बारीक दाण्याचा आणि उत्तम गुणवत्तेचा आहे. महाराष्ट्रात पाणथळ जमिनीमध्ये लागवडीसाठी शिफारस.
२. कारळ : कोकण कारळा (आरटीएनएन२) : अधिक उत्पादन देणारा आहे. खरीप हंगामात कोकण विभागात लागवडीसाठी शिफारस.
फळे व भाजीपाला वाण
फळे, भाजीपाल्याचे ८ वाण प्रसारणासाठी सादर करण्यात आले. त्यापैकी आंब्याचा राजकेशर (एफआरएफसी-१) हा वाण केसर आंब्यापेक्षा किती दिवस लवकर काढणीस येतो, या माहितीसह पुढील वर्षी सादर करावा. तसेच दुधी भोपळ्याचा ‘फुले अनमोल (आर.आर.आर.बी.जी.-३५)’ हा वाण समितीने सूचित केलेल्या माहितीसह पुढील वर्षी सादर करण्याच्या सूचना संबंधित शास्त्रज्ञांना करण्यात आल्या. ८ पैकी ६ वाणांची शिफारस मंजूर करण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
१. जांभूळ : फुले नीलकंठ (आरएचआरजे-७/१) : फळांचा आकार मोठा आहे. उत्कृष्ट टिकवण आणि जास्त उत्पादन देणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
२. मोसंबी : फुले रसिका (सिलेक्शन -७) : जास्त रसाचे प्रमाण आणि अधिक उत्पादनक्षम असलेल्या या वाणाची पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
३. भेंडी : फुले गायत्री (आरएचआरओकेएच-०१) : हा संकरित वाण हिरव्या रंगाचा, मध्यम आकाराची फळे, अधिक उत्पादन देणारा आहे. महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस.
४. पालेभाजी करडई : फुले अभिलाषा (एसएसएफ-०७) : हिरव्या पानांचे अधिक उत्पादन देणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पालेभाजी म्हणून लागवडीसाठी शिफारस.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
१. खिरणी : पीडीकेव्ही-आधार (एम.जी.के.-३१) : या वाणाची कलमाकरिता खुंट म्हणून प्रसारित करण्याची शिफारस.
२. सीताफळ : पीडीकेव्ही- संगम (सीए-१२-०३) : मोठ्या आकाराच्या फळांचा, अधिक गर, अधिक उत्पादन देणारा, जास्त विद्राव्य घटक असलेला असून लागवडीकरिता शिफारस.
कृषी यंत्रे, अवजारे
तांत्रिक सत्रामध्ये सादर एकूण २२ पैकी १८ यंत्रे व अवजारांच्या प्रसारणासाठी मान्यता देण्यात आली. त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांचे २, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ९, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३ तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४ यंत्रांचा समावेश आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
१. भाजीपाला टोकण यंत्र
२. सेमी ऑटोमॅटिक पंफिग कम पॉपिंग यंत्र (खारमुरे, फुटाणे निर्मिती यंत्र)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
१. इंजिनचलित सोयाबीन कापणी यंत्र
२. विद्युतशक्तीवर चालणारे जवस पीक मळणी यंत्र
३. बैलचलित शून्य मशागत भात टोकण यंत्र
४. बायोमास डिस्टिलेशन प्रणाली (गवती चहा, सिट्रोनेला पासून तेल निर्मितीकरिता)
५. वन्यप्राणी प्रतिबंधक तथा सौर प्रकाश सापळा
६. मनुष्यचलित सौर ऊर्जेवरील गांडूळ खत पसरविणे यंत्र
७. फिरते धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्र
८. मिनी बेसन मिल
९. ट्रॅक्टरचलित फिरते सोयाबीन ड्रायर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
१. ट्रॅक्टरचलित फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित
२. ट्रॅक्टरचलित फुले फळबाग तण कापणी यंत्र
३. विद्युत मोटारचलित फुले भुईमूग शेंगा तोडणी यंत्र
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
१. विद्युतशक्तीवर चालणारे हात भात रोपे लावणी यंत्र (कोकण प्रसन्ना)
२. तिरफळ सोलणी यंत्र
३. पेक्टीन एक्स्ट्रॅक्शन युनिट
४. स्वयंचलित सतत उष्ण हवा झोत विविध धान्य लाह्या निर्मिती संयंत्र
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.