Election Code of Conduct : अजूनही खतपोत्यांवरील मोदींच्या फोटोचा पेच सुटेना

PM Modi Photo on Fertilizer Bag : खतांच्या पिशव्यांवर असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खत विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आचारसंहितेत खताची विक्री करायची कशी? हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.
PM Modi Photo on Fertilizer Bag
PM Modi Photo on Fertilizer BagAgrowon

Solapur News : लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच समीकरण आपल्याकडे गेल्या दहा वर्षांपासून आहे. लोकसभा निवडणुकीच आचारसंहिता एकीकडे जाहीर झाली असताना दुसरीकडे जिल्ह्यातील खत विक्रेते वेगळ्याच चिंतेत आहेत. खतांच्या पिशव्यांवर असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खत विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आचारसंहितेत खताची विक्री करायची कशी? हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खतांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावून जाहिरात करण्यात आल्याचे दिसले. सर्वच कंपन्यांनी युरिया, डीएपीच्या पिशवीवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र लावले आहे.

PM Modi Photo on Fertilizer Bag
Code of Conduct for Elections : यवतमाळ जिल्ह्यातील १६ हजार महिला साडीपासून वंचित

या प्रयत्नांमुळे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेही असतील परंतु आचारसंहिता काळात खत विक्रेत्यांच्या रोजी-रोटीवरच आता परिणाम होऊ लागला आहे. यावर्षी वेळेवर पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खत विक्री वेळेत व चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना होती. प्रत्यक्षात मात्र आता खत विक्रीसाठी मोदींची प्रतिमा झाकण्याचा भुर्दंड सहन करण्याचा किंवा आचारसंहिता संपेपर्यंत वाट पाहण्याचा विक्रेत्यांपुढे पर्याय दिसत आहे.

आकडे बोलतात…

जिल्ह्यातील कृषी दुकानदार २४८५

जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठा ३ हजार टन

जिल्ह्यातील उपलब्ध खतांच्या पिशव्या ६० हजार

एका पिशवीसाठी लागणारी हमाली १० रुपये

एका खताच्या पिशवीवर स्टिकरसाठी खर्च ५ रुपये

PM Modi Photo on Fertilizer Bag
Ration Distribution : आनंदाचा शिधा वाटपाला आचारसंहितेचा ब्रेक्र
खतांच्या पिशवीवर असलेले पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र झाकून विक्रेत्यांनी खतांची विक्री करावी, अशा सूचना आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही विक्रेत्यांना तोंडी सूचना दिल्या आहेत.
दत्तात्रय गावसाणे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
आचारसंहितेचे पालन होणे व शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाने या संदर्भात काय सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील खतांची स्थिती काय आहे? या संदर्भातील माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी
खत दुकानांच्या बाहेर पंतप्रधान मोदी यांचे फलक लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आम्ही फलक लावले होते. आचारसंहितेत हे फलक काढले. खतांच्या पिशवीवरील पंतप्रधानांचे छायाचित्र झाकणे खर्चिक आहे. त्यासाठी लागणारा खर्च कोणी करायचा? हा आमचा प्रश्‍न आहे.
बालाजी चौगुले, सचिव, जिल्हा कृषी विक्रेते संघटना, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com