Solapur Doodh Sangh : कारभार पेलवत नसेल तर, प्रशासक नेमा

Doodh Sangh Administration : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा कारभार संचालकांना पेलवत नसेल, तर संघावर प्रशासकाची नेमणूक करा, अशी जोरदार मागणी सभासद संस्था प्रतिनिधींनी जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेत केली.
Solapur Doodh Sangh
Solapur Doodh SanghAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा कारभार संचालकांना पेलवत नसेल, तर संघावर प्रशासकाची नेमणूक करा, अशी जोरदार मागणी सभासद संस्था प्रतिनिधींनी जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेत केली. संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे या सभेला दस्तुरखुद्द अध्यक्ष, उपाध्यक्ष हे दोघेही गैरहजर राहिले.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडली. या सभेला संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे व उपाध्यक्ष दीपक माळी यांच्यासह नऊ संचालक गैरहजर होते.

Solapur Doodh Sangh
Gokul Doodh Sangh : ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३ कोटींचा दिवाळी फरक

आठ संचालकाच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. ज्येष्ठ संचालक औदुंबर वाडदेकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी वाडदेकर यांनी सध्या संस्था प्रचंड आर्थिक अडचणीला तोंड देत असून, संस्थेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली.

किरकोळ शाब्दिक चकमक वगळता ही सभा शांततेत पार पडली. या सभेला ज्येष्ठ माजी संचालक राजेंद्रसिंह राजे भोसले, संचालक मारुती लवटे, विजय येलपले, शंभुराजे मोरे, राजेंद्र मोरे, बाळासाहेब माळी, मनोज गरड, अशोक पाटील, तज्ञ संचालक मारुती ढाळे यांच्यासह संघ बचाव कृती समितीचे अनिल अवताडे ,भाऊसाहेब धावणे, विकास गायकवाड व जिल्ह्यातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Solapur Doodh Sangh
Solapur Doodh Sangh : दूध, पशूखाद्य, भुकटीनिर्मितीसाठी 'अमूल'शी करार करणार

गांभीर्य आहे की नाही

जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला काही अपरिहार्य कारणामुळे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे उपस्थित राहिले नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर उपाध्यक्ष दीपक माळी ही अनुपस्थित होते. त्यांच्यासह संचालक योगेश सोपल, बबनराव अवताडे, महिला संचालक अलका चौगुले, निर्मला काकडे, वैशाली शेंबडे, छाया ढेकणे, तज्ञ संचालक सुरेश हसापुरे हे अनुपस्थित होते.

मात्र वर्षातून एकदा होणारी संघाची ही सभा नियोजित असतानाही स्वतः अध्यक्ष, उपाध्यक्षच गैरहजर राहत असतील तर काय, अशी भावना सभासदांची झाली. या पदाधिकाऱ्यांना संघाविषयी गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्नही सभासदांनी उपस्थित केला.

सभासद झाले आक्रमक

या सभेत करमाळा येथील विलास जाधव या संस्थाचालकाने संघ चालवण्यात संचालक मंडळ कुचकामी ठरले असून, संघावर प्रशासकाची नेमणूक करा, अशी मागणी केली. डिकसळ येथील संस्थाचालक भाऊसाहेब धावणे यांनी ताळेबंद पत्रक न देता सभा कशी बोलावली याबद्दल जाब विचारत टँकर घोटाळ्याबाबत प्रश्न विचारत सभासदांना खरी माहिती देण्याचे आवाहन केले. तर अनिल अवताडे यांनी प्रशासकाच्या काळापेक्षा संचालक मंडळाच्या कालावधीत संघास २२ कोटी कर्ज कसे वाढले, याबाबतची विचारणा केली. त्याचबरोबर पिशवी बंद दुधाच्या विक्री वाढीसाठी संचालकांनी काय प्रयत्न केले, अशीही विचारणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com