Solapur Doodh Sangh : दूध संघाची पंढरपुरातील जागा विक्रीचा निर्णय

Latest Agriculture News : मुंबईच्या जागा विक्रीबाबत यापूर्वी सात वेळा निविदा प्रक्रिया राबवली, पण प्रतिसाद मिळाला नाही. संघाच्या आर्थिक अडचणीमुळेच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या पंढरपुरातील जागा विक्रीचा निर्णय घेतला आहे.
Solapur Doodh Sangh
Solapur Doodh SanghAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मुंबईच्या जागा विक्रीबाबत यापूर्वी सात वेळा निविदा प्रक्रिया राबवली, पण प्रतिसाद मिळाला नाही. संघाच्या आर्थिक अडचणीमुळेच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या पंढरपुरातील जागा विक्रीचा निर्णय घेतला आहे. या जागा विक्रीशिवाय संघाचा खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिले.

सोलापूर जिल्हा दूध संघाची वार्षिक सभा श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, संचालक मारुती लवटे, विजय येलपले, औदुंबर वाडदेकर, सुरेश हसापुरे, योगेश सोपल, बाळासाहेब माळी, जयंत साळे, राजेंद्रसिंह पाटील, मारुती ढाळे, मनोज गरड, वैशाली शेंबडे आदी उपस्थित होते.

Solapur Doodh Sangh
Kolhapur Shetkari Sangh : जिल्हाधिकारी चले जाव; शेतकरी संघाच्या समर्थनात फलकबाजी, सभासद संतप्त

श्री. शिंदे म्हणाले, की संघाचा वाढलेला खर्च, तोट्यातील मार्ग आणि त्यावर काय मार्ग काढता येईल, याचा अभ्यास आपण केला. आपण पदभार घेतला, तेव्हा दूध संघाचे संकलन १७ हजार लिटरवर होते, ते ८० हजार लिटरवर पोहोचले आहे. दूध वाढले, तरी तोटाही दुसरीकडे वाढला आहे. या सर्वांवर मात करायची झाल्यास, पैशांची तरतूद महत्त्वाची आहे,

त्यासाठीच मुंबईची जागा विकण्याचा निर्णय आपण घेतला, पण मुंबईची जागा विकता आली नाही, ती विकली असती, तर कर्जाचा बोजा कमी झाला असता, नवीन काही तरी करता आले असते, पण ते शक्य झाले नाही, त्यामुळेच आता पंढरपूरच्या जागा विक्रीचा निर्णय घेतला आहे.

Solapur Doodh Sangh
Warana Dudh Sangh : वारणा दूध संघाचा मोठा निर्णय, म्हैस दूध विक्री दरात ३ रुपयांची वाढ

एका दूध संघाला पशुखाद्य पुरवठा करून आणि एडीडीबीच्या मदर डेअरीला दूधपुरवठा करण्यासाठी बोलणी सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या वेळी भाऊसाहेब धावणे, दीपक आवताडे यांनीही काही मुद्दे मांडले. विषयाचे वाचन लेखाधिकारी दीपक पाटील यांनी केले.

उजनी धरणाच्या पाण्याबाबत ठराव

यंदा पाऊस कमी झाल्याने उजनी धरणात २५ टक्के इतकेच पाणी आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भरलेल्या धरणात ८५ टक्के पाणी ठेवून उर्वरित पाणी उजनीसाठी सोडण्याचा ठराव शिवाजीराव पाटील चांदजकर यांनी मांडला. तसेच उन्हाळ्यात पाणी सोडले, तर उजनीपर्यंत येत नाही, म्हणून आताच पाणी सोडण्याची मागणी पाटील यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com