Swabbhiman Sabalikaran Yojana : स्वाभिमान सबलीकरण योजनेसाठी जमीन देण्याचे आवाहन

Agriculture Land : शेतकऱ्यांना सहायक आयुक्त, समाज कल्याण, दुसरा मजला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेटसमोर, जुनी डालडा फॅक्टरी कंपाउंड, लातूर कार्यालयात अर्ज करता येतील.
Agricultural Land Transactions
Agricultural Land TransactionsAgrowon
Published on
Updated on

Latur News : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायत जमीन शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते.

योजनेसाठी जिल्ह्यात जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची आहे. सरकारी बाजारभावाने जमीन विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या तपशीलासह अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

Agricultural Land Transactions
Agriculture Land Management : पाणथळ जमिनीमध्ये करावयाच्या उपाययोजना

शेतकऱ्यांना सहायक आयुक्त, समाज कल्याण, दुसरा मजला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेटसमोर, जुनी डालडा फॅक्टरी कंपाउंड, लातूर कार्यालयात अर्ज करता येतील. जमिनीची विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान दोन एकर बागायती किंवा चार एकर जिरायती जमीन स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे. कमाल जमिनीची अट नाही.

ही जमीन निर्धोक व बोजारहित असावी. तसेच जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात प्रकरण अथवा महसूल विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे अपील प्रकरण चालू नसावे. जमीन बागायती असल्यास पाण्याची काय सोय आहे व जमीन रस्त्यालगत आहे, की आतमध्ये आहे. आतमध्ये असल्यास जमिनीकडे जाण्यास रस्ता अर्जात नमूद करणे आवश्यक आहो.

Agricultural Land Transactions
Agriculture Land : अमरावती जिल्ह्यातील ५४ हजार हेक्टर शेतजमीन नापेर

योजनेत जिरायतीसाठी एकरी पाच लाख रुपये व बागायती जमिनीसाठी आठ लाख रुपये भाव देण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असल्यास त्या सर्व व्यक्तींची संमती व स्वाक्षरी अर्जावर असणे आवश्यक आहे. मोजणी करूनच जमिनीच्या खरेदीचा निर्णय घेण्यात येईल.

योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यास अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गावात जमीन उपलब्ध झालेली आहे, त्या गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांची यादी मागवून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावा व अधिक माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com