Agriculture Land Management : पाणथळ जमिनीमध्ये करावयाच्या उपाययोजना

Wetland Measures : कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असली तरी एका मर्यादेपेक्षा अधिक पाणी झाल्यास त्यात पिकाची वाढ उत्तम होत नाही. वनस्पतींच्या संतुलित वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जमिनीतील पाणीपातळी ही मातीच्या विविध गुणधर्मांवर परिणाम करते.
Wetland Agriculture
Wetland Agriculture Agrowon
Published on
Updated on

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. रमेश चौधरी

Indian Agriculture : कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असली तरी एका मर्यादेपेक्षा अधिक पाणी झाल्यास त्यात पिकाची वाढ उत्तम होत नाही. वनस्पतींच्या संतुलित वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जमिनीतील पाणीपातळी ही मातीच्या विविध गुणधर्मांवर परिणाम करते. विशेषतः दीर्घकाळ पाणी साचून राहत असलेल्या जमिनीला मृदा जलसाठण म्हणतात. अशा जमिनीमध्ये हवा खेळती राहत नसल्याने मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये खूप बदल होतात. अशा जमिनीत पीक घेणे कठीण होते. या स्थितीत पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करून घेण्याच्या उपाययोजना राबवाव्या लागतात. त्यातून जमिनीच्या गुणधर्मात आवश्यकतेनुसार बदल करून पीक उत्पादन घेता येते. बहुतांश सर्व वनस्पतींच्या चांगली वाढ आणि उत्पादनासाठी मातीतील कणांच्या पोकळीमध्ये कमाल ७५ टक्के पाणी आणि २५ टक्के हवा भरलेली असणे चांगले मानले जाते. त्यामुळे झाडांची मुळे हवेविना गुदमरत नाहीत.

जमिनीत पाणी साचण्याची प्रमुख कारणे

जमिनीत पाण्याची पातळी जास्त असणे.

पावसाचे पाणी कमी असणे.

मातीच्या थरात खडक किंवा चिकणमातीचा थर असल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणे.

चिकणमातीचे अधिक प्रमाण आणि मातीची क्षारता इ. परिस्थितीमुळे पाणी साचण्यास प्रोत्साहन मिळते.

Wetland Agriculture
Wetlands : पाणथळ जागा : जलसंरक्षणासोबतच जिवंत परिसंस्था

माती पाण्यात मिसळण्याचे प्रकार

अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे तात्पुरत्या स्वरुपात जमिनीत पाणी साचते.

समुद्राचे पाणी आसपासच्या जमिनीवर पसरून जमिनी पाण्याखाली बुडणे.

पावसाळ्यात वाहणारे पावसाचे पाणी जमिनीच्या खोलगट भागामध्ये जमा होत राहते. जमिनीची उंचसखलपणामुळेही पाणी साचण्यास प्रोत्साहन मिळते.

पावसाळ्यात भूगर्भातील पाण्याचा उपसा झाल्यामुळे या प्रकारच्या जमिनी जलमय होतात.

जमिनीत पाणी साचण्यास प्रोत्साहन देणारे घटक

नैसर्गिक घटक : जमिनीचे पाणी धरून ठेवणारे गुणधर्म, अतिवृष्टी, जवळच्या जलसंधारण प्रकल्प किंवा जवळून जाणाऱ्या कालव्यांतून होणारा पाझर इ.

मानवनिर्मित घटक : अयोग्य निचरा पद्धती, पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देणे इ.

माती पाण्यात मिसळण्याचे परिणाम

मातीत पाणी साचल्यामुळे मातीच्या छिद्रांमध्ये असलेली हवा बाहेर पडते. जमिनीतील संपूर्ण पोकळ्या पाण्याने भरतात. हवेची हालचाल रोखली जाते.

पाणी सतत स्थिर राहिल्याने माती तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी मातीची घनता वाढत ती कठीण होते.

सतत पाण्यात बुडल्याने जमिनीचे तापमान कमी राहते. त्याचा जिवाणूंच्या क्रियांवर परिणाम होतो. त्याचा फटका वनस्पतींना अन्नद्रव्यांच्या उपलब्ध होण्याला बसतो.

मातीचा सामू कमी होत जमिनी आम्लयुक्त बनतात.

पिकांना नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि जस्त या उपलब्ध अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. तर लोह आणि मँगेनीज या अन्नद्रव्यांची अतिरिक्ततेची लक्षणे जाणवतात.

Wetland Agriculture
Soil Health : पाणथळ, क्षारपड जमिनीवरील उपाययोजना, शिफारशी

पाणी साचल्यामुळे विद्राव्य क्षार, इथिलीन वायू, मिथेन वायू, ब्युटीरिक ॲसिड, सल्फाइड्स, फेरस आयन आणि मँगेनीज आयन असे काही विषारी पदार्थ तयार होतात. ते झाडांकडून उचलले गेल्यामुळे झाडांमध्ये त्यांचे प्रमाण वाढून विषारीपणा वाढू शकते. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा केल्यास मुळांच्या परिसरात मोकळी हवा खेळती राहते. परिणामी या घटकांची विषाक्तता कमी होते.

जमिनीत पाणी साचल्यामुळे बहुतांश पिके तग धरू शकत नाही. अपवाद फक्त भाताचा. भात पीक वाढीसाठी आवश्यक ऑक्सिजन हवेतून घेतात आणि देठांद्वारे पुरवतात. पाणथळ जागांमध्ये वाढणारी काही झाडे देठावर फुग्यासारखी रचना तयार करतात आणि आवश्यकतेनुसार त्यातील हवेचा वापर करतात. मात्र या स्थितीत काही विषारी पदार्थ तयार होतात. त्यांचा झाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन पाने कोमेजणे, पाने काठाकडून खाली वळणे आणि पडणे, पाने गळणे, पाने पिवळी पडणे, मुळांची वाढ कमी होणे इ. लक्षणे आढळतात.

पाणी साठलेल्या जमिनींचे व्यवस्थापन

जमिनीच्या पृष्ठभागाचे सपाटीकरण योग्य पद्धतीने करावे. त्यामुळे जास्त पाणी साचत नाही. झाल्यास निचरा लवकर होतो.

अनियंत्रित सिंचनामुळे जमिनीत अतिरिक्त पाणी साठते. हे टाळले पाहिजे.

कालव्यातील पाणी गळतीमुळे जमिनीत पाणी साचते. या गळतीवर वेळीच उपाययोजना कराव्यात.

पूरग्रस्त भागात बहुतेक शेतीयोग्य जमिनी पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून या भागात बांध टाकून पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जाऊ शकतो.

अशा शेतामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असणाऱ्या झाडांची लागवड करणे. उदा. सॅलिक्स, मूंज गवत, सदाहरित झाडे, शिशम, सफेडा आणि बाभूळ अशा काही झाडांच्या प्रजाती जास्त बाष्पोत्सर्जन करून भूगर्भातील पाणी पातळी कमी करण्यास मदत करतात.

अनेक पिके काही प्रमाणात जमिनीतील पाणी साचण्याची स्थिती सहन करू शकतात. पिकाच्या पाणी सहनशीलतेनुसार निवड करता येते.

साधारणपणे ओलसर जमिनीत चिकणमाती आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१

(सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com