Agriculture Land : अमरावती जिल्ह्यातील ५४ हजार हेक्टर शेतजमीन नापेर

Agriculture Sowing Update : रब्बी हंगामाच्या पेरणीस आता गती येऊ लागली असून, आतापर्यंत ६३ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र तुलनेने अधिक असून, ७३ हजार ४९१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Amravati News : रब्बी हंगामाच्या पेरणीस आता गती येऊ लागली असून, आतापर्यंत ६३ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र तुलनेने अधिक असून, ७३ हजार ४९१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील गव्हाखाली केवळ १७ हजार ११४ हेक्टर क्षेत्र असून, एकूण ९४ हजार ४२५ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. अद्याप अपेक्षित पेरणी क्षेत्रापैकी ५४ हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे.

महिनाभरापूर्वी रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून, जमिनीतील ओलावा व कमी थंडी, यामुळे पेरण्यांना विलंब झाला. तथापि, हरभरा पिकाची पेरणी प्रारंभ झाली होती. गव्हाची पेरणी जानेवारीपर्यंत होत असल्याने ती संथ आहे.

Agriculture
Rabi Sowing : लातूर विभागात साडेबारा लाख हेक्टरवर रब्बी पेरण्या

दरम्यान या वर्षी १ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी कृषी विभागाने अपेक्षित केली आहे. त्यातुलनेत आतापर्यंत ९४ हजार ४२५ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. या हंगामात गहू, हरभरा व कांद्याची लागवड केली जाते.

Agriculture
Agriculture Sowing : परभणी, हिंगोलीत तूर, मूग, उडदाच्या पेरणीत घट

सोयाबीन निघाल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या शेतजमिनीवर रब्बीची लागवड होत असून, हरभऱ्याखाली आतापर्यंत ७३ हजार ४९१ हेक्टर क्षेत्र आले आहे. गव्हाच्या पेरणीने अजून वेग धरला नसून १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. काद्यांखाली केवळ १२३५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

पेरणीची सद्यःस्थिती (हेक्टर)

एकूण अपेक्षित क्षेत्र १,४८,८७९

प्रत्यक्षात पेरणी क्षेत्र ९४,४२५

सरासरी ६३ टक्के

हरभरा ७३,४९१

गहू १७,११४

कांदा १२३५

मका १०७०

ज्वारी ११०

भाजीपाला १३३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com