‘भाजप’च्या ‘भारत तोडो’ला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या

एच. के. पाटील : शिर्डीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratAgrowon

नगर : ‘‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार (BJP Government) हे लोकशाही विरोधी, जनविरोधी आहे. हे सरकार पलटवले पाहिजे. देश उभारणीत काँग्रेसचे (Congress) मोठे योगदान आहे. परंतु ८ वर्षांत देशातील वातावरण पूर्णपणे बदलले. जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने (Bharat Jodo) उत्तर द्या,’’ असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी, जि. नगर ः येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरातील ठराव व प्रस्ताव यांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक विषयावर आधारित सहा गट विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची, या संदर्भात एक ठोस धोरण ठरवले. त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाईल. ‘एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे.’’

राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटांची चर्चा झाली. या गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसऱ्या दिवशी सादरीकरण होईल.

‘कॉंग्रेसचा विचारच देशाला तारेल’

मंत्री थोरात म्हणाले, ‘‘समतेचा संदेश देणाऱ्या साईबाबाच्या पावन नगरीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. सर्व संतांनी समता, बंधूभावाचा संदेश दिला. माणसा-माणसात भेदभाव करू नये, ही संतांची शिकवण आहे. काँग्रेसचा विचारही याच समतेच्या विचारावर आधारलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनीही तोच विचार दिला. तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा हा विचारच देशाला तारणारा आहे. देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com