Dry Animal Fodder
Dry Animal FodderAgrowon

Fodder Storage : सुक्या चाऱ्याची योग्य साठवण

Dry Fodder Stock : सुका चारा साठवण करताना ज्यास्तीत ज्यास्त उंचीची गंज शक्यतो टाळावी. कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालावते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते.
Published on

डॉ.शांताराम गायकवाड

Animal Fodder Update : पावसाळ्यात वेळेअभावी किंवा नकळतपणे जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत चारा आणि पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून ठेवावी.

उपलब्ध चारा व शेतातील पिकांचे अवशेष जसे वाळलेले गवत, गव्हाचे काढ, भात पेंढा, तूर व हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेली वैरण इत्यादींची योग्य रीतीने साठवणूक करावी. त्याची पचनियता व पौष्टिकता वाढवणेसाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात.

आपल्याकडे अनेकदा शेतीतील पिकांचे वाळलेल्या अवशेषांना सुका चारा संबोधले जाते परंतु पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये आणि हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय.

सुका चारा साठवण करताना ज्यास्तीत ज्यास्त उंचीची गंज शक्यतो टाळावी. कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालावते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते.

जेथे पावसाळ्यात पाणी साठवून राहणार नाही अशा ठिकाणी साठवण करावी.चारा साठवणूक जमिनीपासून १ ते २ फुट उंचीवर लाकडाचे ओंडके ठेऊन किंवा दगडांच्या साहाय्याने करावी. जेणे करून सहज पावसाच्या पाण्याचा निचरा होईल.

पूर्व तयारी म्हणून चारा साठवण्यासाठीची जमीन एकसारखी समांतर करून घ्यावी.

Dry Animal Fodder
Animal Fodder Shortage : पावसामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी चाराटंचाई

डंबेल शेप पद्धतीत चाऱ्याची साठवण करावी. शेवटचा थर हा योग्य पद्धतीने लावून घ्यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अणकुचीदार अवशेष वरती येणार नाहीत.

वातावरणातील घटकांपासून संरक्षण होण्यासाठी चारा चहूबाजुंनी झाकला जाईल यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करावा.

चारा साठवणूक ही संपूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशा ठिकाणी करावी जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आद्रतेमुळे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणार नाही. चारा टिकण्यासाठी मदत होईल.

सुका चारा पचनास योग्य आणि अधिक पौष्टीक करण्यासाठी करावा लागणाऱ्या प्रक्रिया या साठवण करताना चाऱ्यामध्ये असणाऱ्या ओलाव्याचे प्रमाण यावरून कराव्यात.सुक्या चाऱ्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे २० टक्यांपेक्षा कमी असावे, जेणेकरून कोणत्याही बुरशीच्या वाढीस योग्य वातावरण तयार होणार नाही.चारा हा चहूबाजुंनी व्यवस्थित झाकला जाईल याची दक्षता घ्यावी.

संपर्क - डॉ. शांताराम गायकवाड, ९५०३८०१७९५, (सरव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com