Agritourism : दुष्काळात कृषी पर्यटनातून चैतन्य

Agrotourism Farm Idea : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे मनोज गोडसे यांनी सर्व सुविधांनी युक्त चैतन्य कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. शेती-निसर्गाने समृध्द, घरगुती वातावरण, तत्पर सेवा आदी वैशिष्ट्यांनी युक्त केंद्राकडे पर्यटकांचा वाढता ओढा आहे.
Agrotourism with Manoj Godse
Agrotourism with Manoj GodseAgrowon

Success Story of Agritourism during Drought Condition : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसतो आहे. याच तालुक्यातील
डिस्कळ गावात मनोज व गजानन या दोन भावांचे कुटुंब आहे. घरची साडेपाच एकर शेती
आहे. बागायती, जिरायतीनुसार त्यात भाजीपाला व हंगामी पिके असतात. कोरोना काळात मनोज यांनी शेती बागायती करण्यासाठी मुरमाड जमिनीत शेततळे उभारले. त्याची क्षमता सव्वा दोन कोटी लिटर होती.

तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांनी भेटीवेळी त्यात मत्सपालन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कोलकता येथून तिलापिया जातीचे मत्सबीज आणून पिंजरा पद्धतीने त्यांचे संगोपन सुरू केले. त्या काळात १२ टनांपर्यंत माशांचे उत्पादन मिळाले. किलोला १८० रुपये दराने विक्री झाली. काही लाख रुपयांचे अनपेक्षित यश दुष्काळात व कोरोना काळात मिळाल्याने कुटुंबात चैतन्य निर्माण झाले.

Agrotourism with Manoj Godse
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

कृषी पर्यटन केंद्राचा विकास

दुष्काळात यशस्वी झालेली ही मत्सशेती दाखवण्यासाठी श्री. काळे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना गोडसे यांच्या शेतात घेऊन आले. शेततळ्याभोवतीची आंब्याची बाग व झाडांची विविधता पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचे सुचवून त्याबाबत मार्गदर्शनही केले.

दुष्काळात शेतीला हा चांगला आधार होईल असे वाटून त्यादृष्टीने मनोज यांनी पुढील तयारी सुरू केली. राज्यातील विविध कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी केली. तेथील टिप्स घेतल्या. भांडवल मर्यादित असल्याने कमी खर्चात टप्प्याटप्प्याने केंद्र विकसित करण्यास सुरवात केली.

शेततळ्यांच्य़ा बाजूला स्वतःबरोबर चुलत्यांचीही बाग असल्यानेही त्याचाही खुबीने वापर करून घेतला. केंद्राचा विचारपूर्वक आराखडा, मेहनत, धडाडी यांच्या जोरावर सुमारे साडेपाच एकरांत २०२२ च्या सुमारास चैतन्य कृषी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. अजून साडेसात एकर क्षेत्र खरेदी केले असून तेथेही पुढे विकास केला जाणार आहे.

पर्यटन केंद्रातील सुविधा

शेततळ्याच्या भोवती केंद्राची रचना. पूर्वी जनावरांसाठी असलेल्या शेडचा कार्यालयासाठी वापर.

भाजीपाला- फळे विक्रीसाठी छोटे गाळे, विविध कार्यक्रम वा निवांत बैठकीसाठी हिरवेगार प्रशस्त लॅानचा स्वीमिंग टँक. ‘चेंजिंग रूम्स’.

मुलांसाठी खेळ, ‘रेन डान्स’, घोडा व बैलगाडी, टँक्ट्रर सवारी, भैरवनाथ जोगेश्वर मंदिर फेरी,झुलता पूल, बोटिंग

सध्या एक दिवसाचे पर्यटन. पुढील काळात निवासी सोय करणार.

मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या. आंबा, नारळ., सुपारी, सीताफळ, जांभूळ आदी दहा प्रकारची फळझाडे. भाजीपाला लागवड. पर्यटकांना थेट शेतात नेऊन भाज्या काढणीचा आनंद दिला जातो.

केंद्राच्या ठिकाणीही थेट विक्री.

'गेट टुगेदर’, ‘प्रि वेडिंग, साखरपुडा, नामकरण विधीची सोय.

Agrotourism with Manoj Godse
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

आश्‍वासक उलाढाल

पहिल्या वर्षी सुमारे तीन हजार पर्यटकांनी भेट देत सुमारे १५ लाखांपर्यंत उलाढाल झाली. पुढील वर्षी सात हजारापेक्षा अधिक ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला. चाळीस लाखाच्या दरम्यान उलाढाल झाली.

यंदाच्या तिसऱ्या वर्षी निवडणूक, दुष्काळाचा परिणाम काही प्रमाणात झाला असला तरी आत्तापर्यंत सहा हजार पर्यटकांनी या केंद्राचा आनंद लुटला आहे. अजून हंगाम शिल्लक असल्याने गेल्यावर्षीपेक्षा पर्यटकांची संख्या अजून वाढेल अशी गोडसे यांना खात्री आहे.

कुटुंबाची साथ

गोडसे परिवारातील प्रत्येक सदस्याने जबाबदारी व कामाचा वाटा उचलल्यानेच शेतीसह कुटुंबाचे अर्थकारण उंचावून प्रगती करणे शक्य झाले आहे. मनोज यांना पत्नी प्रियांका, बंधू गजानन व भावजय दीपाली यांची मोठी साथ शेतीसह पर्यटन केंद्रासाठी मिळते. वडील मोहन दूध संकलन व्यवसाय सांभाळतात. दररोज ८०० ते एक हजार लिटर दूध संकलन होते. सध्या या व्यवसायावर दुष्काळाचा परिणाम दिसून येत आहे. शेती, मत्स्यपालन , दुग्धव्यवसाय व आता जोडीला कृषी

पर्यटन

असे उत्पन्नाचे स्रोत कुटुंबाने बळकट केले आहेत. दुष्काळामुळे सध्या ‘बोटिंग’ तात्पुरते बंद
आहे. मत्सशेतीतील उल्लेखनीय कार्यासाठी मनोज यांना केंद्र शासनाच्या सर्वश्रेष्ठ मत्सकिसान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मनोज गोडसे- ८००७८५९९४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com