Team Agrowon
उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंदर्भात मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा कृषि अधीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला.
अजूनही जिल्ह्यातील ५० ते ७० हजार शेतकरी हे पिकविम्यापासून वंचित आहे. AIC पिकविमा कंपनी वेळकाढू पणाचे धोरण राबवित आहे.
त्यामुळे आज आक्रमक पवित्रा घेत तातडीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
तसेच यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा.एकनाथजी डवले साहेब यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा तुपकर यांनी केली.
तसेच रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा कृषि अधीक्षकांनी पुढील आठवडाभरात पिकविमा जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
जर दिलेले आश्वासन कृषिविभागाने व कंपनीने पळाले नाही, तर मात्र पुढच्या वेळचे आंदोलन हे अधिक आक्रमक असेल व ते प्रशासनाला न परवडणारे असेल. शेतकऱ्यांसाठी मी कितीही वेळा तुरुंगात काय फासावरही जायला तयार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील तुपकर यांनी दिला.