Amritalayam FPO : अमृतालयम ‘एफपीओला’ राष्ट्रीयस्तरावरील दोन पुरस्कार

National Award : ‘मिलियनेयर एफपीओ ऑफ द इअर अॅवॉर्ड-२०२४’ माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते अमृतालयमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.
National Award
National Award Agrowon
Published on
Updated on

Nanded News : शेतकऱ्यांचे मजबूत संघटन आणि शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल कृषी जागरण आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिलियनेयर एफपीओ ऑफ द इअर अॅवॉर्ड-२०२४’ माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते अमृतालयमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

National Award
Sugar Factory Award : भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय को-जनरेशन पुरस्कार

तसेच भारत पर्यावास केंद्र, नवी दिल्ली येथे कृषी व किसान कल्याण मंत्रालय, दिल्ली आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगचे ॲडिशनल सेक्रेटरी मिन्हाज आलम यांच्या हस्ते शेतकरी संघटन बीजोत्पादन आणि ग्रामीण विकास या विशेष घटकासाठी सीआयआय एफपीओ एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या वेळी एस. शिवकुमार, सीमा अरोरा, ग्लेन डेंनिंग (अमेरिका), आशुतोष देशपांडे, योगेश जोशी उपस्थित होते.

‘ॲग्रोवन’चे आभार

‘ॲग्रोवन’मध्ये बीजोत्पादनाबाबत यशकथा प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे अमृतालयम सीड्‌स हा एक चांगला ब्रॅण्ड तयार झाला आणि कंपनीला खूप मोठ्या स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्याबद्दल ॲग्रोवनचा खूप महत्त्वाचा वाटा असून, आमच्या यशस्वी वाटचालीत विसरता येणार नाही, असे माधव तरकंटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com