Seed Production Program : ‘महाबीज’चा ६ हजार हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम

Rabi Seed : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) च्या परभणी विभागात दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो.
Seed Production
Seed ProductionAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महाबीजच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सहा जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ६ हजार ५४१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून ९१ हजार २४१ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) च्या परभणी विभागात दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात विभागात रब्बी ज्वारी ४९० हेक्टर, गहू ३११ हेक्टर, हरभरा ५ हजार २७० हेक्टर, करडई ४११ हेक्टर, जवस ५९ हेक्टर असा मिळून ६ हजार ५४१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे.

Seed Production
Soybean Seed Production : ‘सोयाबीन बीजोत्पादनात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका महत्त्वपूर्ण’

परभणी जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस मिळून एकूण २ हजार ७ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून २९ हजार ८७९ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. हिंगोली जिल्ह्यात गहू, हरभरा, करडई मिळून एकूण १ हजार ५८६ हेक्टर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून त्यापासून २४ हजार ४३५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

Seed Production
Onion Seed Production : उत्तम बियाण्यांसाठी शास्त्रीय कांदा बीजोत्पादन

नांदेड जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडईचा मिळून एकूण ३६६ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून त्यापासून ५ हजार ९२० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. लातूर जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस मिळून एकूण १ हजार २७४ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून १५ हजार २७२ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

धाराशिव जिल्ह्यात ज्वारी, हरभरा, करडई, जवस मिळून एकूण ९६९ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून १२ हजार ६१४ क्विटंल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, हरभरा, करडईचा ३३९ हेक्टर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून ३ हजार १२१ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, असे कान्हेड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com