Crate Production : अमरावती जिल्हा झाला क्रेट उत्पादनाचे हब

Orange Storage : नागपुरी संत्रा उत्पादनात देशभरात आघाडीवर असलेला अमरावती जिल्हा आता क्रेट उत्पादनाचे हब म्हणून नावारूपास येत आहे.
Vegetable Crate
Vegetable Crate Agrowon

Amaravati News : नागपुरी संत्रा उत्पादनात देशभरात आघाडीवर असलेला अमरावती जिल्हा आता क्रेट उत्पादनाचे हब म्हणून नावारूपास येत आहे. संत्रा फळांच्या वाहतुकीकरिता प्लॅस्टिक क्रेटची गरज भासते.

त्या पार्श्‍वभूमीवर या भागा‍त क्रेट उत्पादनाचे तब्बल सात कारखाने उभे झाले आहेत. त्या माध्यमातून दररोज सुमारे २२ हजारांवर क्रेटचे उत्पादन होत असून, रोजगार निर्मितीचा देखील हा सक्षम पर्याय ठरला आहे.

संत्र्याखालील राज्यातील दीड लाख हेक्‍टरपैकी एक लाख हेक्‍टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात व त्यातील ७० हजार हे एकट्या वरुड, मोर्शी तालुक्‍यात आहे. त्यामुळेच त्यावर आधारित रोजगाराचे प्रकल्पही या भागात उभे होत आहेत. सुरुवातीला संत्र्याच्या पॅकिंगसाठी लाकडी पेटीचा वापर होत होता. त्याकरिता वृक्षतोड होत असल्याने त्यानंतरच्या काळात कोरोगेटेड बॉक्‍सचा पर्याय उपलब्ध झाला.

Vegetable Crate
Agriculture Plowing : नांगरटीची वेळ, खोली अन् फायदे

आता संत्रा पॅकिंगसह वाहतुकीसाठी प्लॅस्टिक क्रेटच्या वापराची पद्धत आली. त्यामध्ये वापरा आणि फेका (यूज ॲण्ड थ्रो) अशा श्रेणीतील क्रेटचाही समावेश आहे. वरुड येथे तिवसाघाट ते मुलताई मार्गावर सहा किलोमीटर अंतरावर सात क्रेटचे कारखाने उभारण्यात आले आहेत. यातील चार कारखान्यांमध्ये दोन सयंत्र आहेत.

Vegetable Crate
Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

तर उर्वरित तीन कारखान्यांमध्ये एक संयंत्र बसविण्यात आले आहे. एका संयंत्रातून तासाला १०० ते ११० क्रेटचे उत्पादन होते. २४ तासांत २००० क्रेटचे उत्पादन एका संयंत्राद्वारे होते. त्यानुसार या कारखान्यांची रोजची क्रेट उत्पादन क्षमता २२ हजार इतकी आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरपासून मार्चपर्यंत संत्र्यासाठी, तर मार्चनंतर दोन-तीन महिने आंबा उत्पादकांना क्रेटचा पुरवठा होतो. एका कंपनीत सरासरी १२ ते १३ कामगार असून, त्यासोबतच क्रेट वाहतूकदारांनाही उत्पन्नाचा स्रोत या व्यवसायातून उपलब्ध झाला आहे.

...असा आहे आकार

आंबा क्रेट ७० रुपये (दहा किलो क्षमता)

संत्रा क्रेट ९० ते १०० रुपये (२० ते २५ किलो क्षमता)

चांगल्या प्रतीचा क्रेट ः १२५ ते १५० रुपये आहे

हंगामात या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा बाजार (मंडी) भरतात. या ठिकाणी संत्रा खरेदी होते व त्याचे देशभरात विक्रीसाठी व्यापारही होतात. या मंडीधारकांकडून वाहतुकीसाठी प्लॅस्टिक क्रेटला मागणी असते. त्यामुळेच वरुड तालुक्‍यात एकाच मार्गावर सहा किलोमीटरच्या अंतरावर सात क्रेट उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. यातील २५ किलो क्षमतेच्या क्रेटचा वापर दिल्ली, बांगलादेशला संत्रा पाठविण्यासाठी होतो. टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर यासाठी होतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा उद्देश साधला जातो.
- विवेक फुटाणे, क्रेट उत्पादक कारखानदार, शेंदूरजना घाट, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com