Amravati District Bank Fraud : अमरावती जिल्हा बँकेवर खोटे ठराव घेत असल्याचा आरोप

Amravati Jilha Bank :ठरावामध्ये समितीबाबत काहीच नमूद नाही, असा बबलू देशमुख यांचा आरोप आहे. ठरावाला विरोध असतानाही इतिवृत्तांतामध्ये हा विषय मंजूर दाखविण्यात आला आहे.
Amravati District Bank Fraud
Amravati District Bank Fraudagrowon
Published on
Updated on

Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेत एक एप्रिल रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या वेळी संचालकांनी केलेली चर्चा तसेच घेतलेले विषय इतिवृत्तांतात न घेता बहुमताने नामंजूर केलेला ठराव मंजूर दाखविण्यात आला, असा खळबळजनक आरोप जिल्हा बॅंकेतील बबलू देशमुख गटातील ११ विरोधी संचालकांनी केला आहे. या संदर्भात संचालकांनी अध्यक्ष बच्चू कडू व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याचे संकेत आहेत.

जिल्हा बॅंकेची संचालक मंडळाची बैठक एक एप्रिल रोजी पार पडली. या सभेमध्ये विषय क्रमांक सातमध्ये संचालक मंडळ सभेने समिती नेमून दिली होती. परंतु ठरावामध्ये समितीबाबत काहीच नमूद नाही, असा बबलू देशमुख यांचा आरोप आहे. ठरावाला विरोध असतानाही इतिवृत्तांतामध्ये हा विषय मंजूर दाखविण्यात आला आहे. विषय क्रमांक २४ ला संचालकांनी मान्यता दिलेली नव्हती, त्याला ११ संचालकांचा विरोध होता.

Amravati District Bank Fraud
Amravati APMC : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार

मात्र ११ संचालकांची मान्यता असल्याचे खोटे लिहिण्यात आले, असा विरोधी संचालकांचा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे विषय क्रमांक ४० ला सुद्धा ११ संचालकांचा विरोध असताना इतिवृत्तांतामध्ये मात्र तो सर्वानुमते मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले आहे. सभागृहामध्ये संचालकांनी नोंदविलेल्या मतांची नोंद इतिवृत्तांतामध्ये घेतली जात नाही, असाही आरोप करण्यात आला आहे.

बॅंकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दबावात नेहमीच खोटे ठराव लिहिण्यात येत आहेत. नाबार्डचा विषय सोडून इतर सर्व विषय तात्पुरते नामंजूर करून आठ दिवसांत संचालक मंडळाची सभा घेण्यात यावी, असे पत्र आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

- बबलू देशमुख, संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक.

आम्ही कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. सर्व निर्णय पारदर्शकपणे घेतले जात आहेत. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांना अन्याय झाला असे वाटत असल्यास त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे जाऊन आपली बाजू मांडावी, आम्ही पुढच्या कारवाईसाठी तयार आहोत.

- अभिजित ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com