Amla Processing Industry: धानपट्ट्यात उभारला आवळा प्रक्रिया उद्योग

Women Enterpreneur: भंडाऱ्याच्या पिप्रा झांझरीया गावातील हर्षा वाहणे यांनी धान पट्ट्यात १५ एकरांवर आवळा लागवड करून त्यावर प्रक्रिया केंद्र सुरू करत शेतीपूरक उद्योगात यशस्वी वाटचाल केली आहे. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी नव्या बाजारपेठ निर्माण केल्या आहेत.
Maharashtra Women Farmer
Maharashtra Women FarmerAgrowon
Published on
Updated on

Bhandara News: धानाचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. मात्र याच जिल्ह्यातील पिप्रा झांझरीया (ता. तुमसर) येथील रहिवासी असलेल्या हर्षा वाहणे यांनी आवळा लागवडीच्या माध्यमातून पीक फेरपालटावर भर देऊन त्यावर प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे.

दुर्गाप्रसाद वाहणे हे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शेतीवर लक्ष देता यावे याकरिता ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या पत्नी हर्षा या गृहिणी आहेत. या कुटुंबाची २० एकर शेती. त्यातील १५ एकरांवर आवळा लागवड आहे. २००६ मध्ये याची लागवड करण्यात आली. २० बाय २० फूट असे लागवड अंतर आहे. एनए-७, एनए-६, एनए-१०, ए-१ याप्रमाणे चार वाणांची लागवड करण्यात आली.

Maharashtra Women Farmer
Amla Processing : आवळा प्रक्रियेतून घडवले भूमिहीन महिलेने ‘करिअर’

हंगामात ३० टन आवळ्यावर प्रक्रिया होते. १५ एकरांतून याची उपलब्धता होत नाही. उर्वरित कच्च्या मालाची उपलब्धता इलाहाबाद (उत्तर प्रदेश) भागातून होते, असे हर्षा वाहणे यांनी सांगितले. उर्वरित पाच एकर क्षेत्रावर उन्हाळी आणि पावसाळी धानाची लागवड केली जाते.

Maharashtra Women Farmer
Spice Industry Success Story: पारंपरिक मसाल्यांचा तयार झाला ब्रॅण्ड

प्रक्रिया उद्योगावर भर

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या पंतप्रधान रोजगार योजनेतून २०१५ मध्ये २५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. मंडळाकडून कर्ज रक्‍कमेवर ३५ टक्‍के अनुदान आहे. उद्योगाकरीता आवश्‍यक संयंत्राची इचलकरंजी तसेच नागपूर भागातून सात लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. त्याआधारे आवळ्यापासून कॅंडी, लोणचे, मुरब्बा, सुपारी, ज्यूस, शरबत, मुखशुद्धी, लाडू असे उपपदार्थ तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधीक मागणी आवळा कॅंडी, सुपारी, मुखशुद्धी या तीन उत्पादनाला आहे. या कार्यात साकोली केव्हीकेच्या तज्ज्ञ डॉ. उषा डोंगरवार यांचे सहकार्य मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

अशी आहे बाजारपेठ

प्लॅस्टिक पिशवीऐवजी बाटलीमध्ये पॅकिंग केल्याने याला ग्राहकांची मागणी राहते. एक ते अर्धा पाव कॅंडी, अर्धा किलो लोणचे, एक पाव ते अर्धा किलो, सुपारी १००, २०० ग्रॅम, ज्यूस ५००- ७५० मिली, शरबत ७५० मिली, मुखशुद्धी ५० व ८० ग्रॅम याप्रमाणे पॅकिंग करुन विक्री होते.

धानपट्ट्यात १५ एकरांवर आवळा लागवडीचा प्रयोग केला. उत्पादीत आवळ्यावर प्रक्रिया होते. हा शेतीपूरक व्यवसाय फायदेशीर ठरला आहे. याची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच खादी ग्रामोद्योगकडून राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हर्षा वाहणे, : ९४०३२४३३७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com