Amit Shah Meeting: अमित शाह यांची सोमवारी नांदेडला ‘शंखनाद’' सभा

Shankhnaad Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (ता. २६) दुपारी २ वाजता नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
Amit Shah
Amit ShahAgrowon
Published on
Updated on

Nanded News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (ता. २६) दुपारी २ वाजता नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेते सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.

Amit Shah
Amit Shah: साखर कारखान्यांना उत्पन्नवाढीचे प्रकल्प बनवण्यासाठी पाठबळ: अमित शाह

अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्याची माहिती देण्यासाठी नांदेड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ ते २७ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

Amit Shah
Amit Shah : आत्महत्यामुक्त महाराष्ट्रासाठी सरकार काम करेल

नवा मोंढा, नांदेड येथे दुपारी २ वाजता आयोजित ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक आमदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील.

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत शेकडो दहशतवादी व त्यांच्या तळांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या गौरवाचा शंखनाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवरच्या ११ वर्षांच्या वाटचालीत २०४७ मधील विकसित भारताची भक्कम पायाभरणी केल्याचा शंखनाद, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या खंबीर नेतृत्वाखाली नक्षलवाद निर्मूलनाबाबत कटिबद्धतेचा शंखनाद आणि महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सज्जतेचा शंखनाद होणार असल्याने या सभेला 'शंखनाद' हे नाव देण्यात आल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com