
Ahilyanagar News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचे प्रमाणेच मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. महाराष्ट्राला आतापर्यंत कोणतेही सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त करू शकले नाही.
आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मात्र महाराष्ट्राला आत्महत्यामुक्त करण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे रविवारी (ता. १२) झाले. अधिवेशनाचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार व पंधरा हजारांच्या जवळपास पदाधिकारी उपस्थित होते.
साईबाबा, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत अमित शहा म्हणाले, ‘‘आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका विधानसभेपेक्षाही मोठ्या मताधिक्याने जिंकायच्या आहेत. भाजप शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे.’’ लोकसभा निवडणुकीत संविधान विरोधी काही शक्तींनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर या वेळी निशाणा साधला.
भविष्यातील महाराष्ट्रासाठी काम करावे लागेल : गडकरी
भाजपच्या राज्य अधिवेशनाला रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. गडकरी म्हणाले, ‘‘भाजपला राज्यातील जनतेने निवडणुकीत मोठ्या विश्वासाने अभूतपूर्व यश दिले.
लोकांनी दिलेला हा विश्वास सार्थ करायचा आहे. ज्या अपेक्षेने यश दिले त्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. शिवशाही स्थापन करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. विजयाच्या विश्वासातून भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यााठी काम करावे लागेल. स्वराज्यातून सुराज्य आणि विकासासाठी काम करावे लागेल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.