Agriculture Technology : शेतीमाल वाळविण्यासाठी पॉलिटनेल ड्रायर

Polytunnel Dryer : पक्वतेच्या अवस्थेतील पीक काढणी करून पॉलीटनेल ड्रायरचा वापर करून वाळवणी केली तर अवकाळी पावसात भिजण्यापासून पीक वाचवता येईल, गुणवत्ता चांगली राखली जाईल.
Polytunnel Dryer
Polytunnel Dryer Agrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास कांबळे

Drying Agricultural Produce Technology : पक्वतेच्या अवस्थेतील पीक काढणी करून पॉलीटनेल ड्रायरचा वापर करून वाळवणी केली तर अवकाळी पावसात भिजण्यापासून पीक वाचवता येईल, गुणवत्ता चांगली राखली जाईल. पंधरा दिवस अगोदर पीक काढणी करता येईल आणि पुढील पीक घेण्याचे नियोजन करायला वेळ मिळेल. यासाठी शेतावर वाळवणी यंत्र उभारणी करणे गरजेचे आहे.

पॉलिटनेल ड्रायरची रचना

बाजारात अनेक प्रकारची वाळवणी यंत्रे उपलब्ध आहेत. पण ती खूप महाग आहेत तसेच ती विद्युत ऊर्जेवर चालणारे आहेत. या यंत्रासाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था करावी लागते. परंतु पॉलिटनेल ड्रायर हे अत्यंत साधे, सोपे आणि कमी किमतीमध्ये हवे तेथे उभारता येते.

यासाठी ग्रामीण भागातील कारागीर पुरेसा आहे. पॉलिहाउसला आत हवा येण्याची आणि बाहेर वाफ सोडण्यासाठी खिडक्या आहेत. आतमध्ये गरजेनुसार एक रॅक तयार करता येतो.

Polytunnel Dryer
Agriculture Technology : तंत्र जाणले यश हाती आले

पॉलिटनेल ड्रायर हवे त्या आकारात बनवता येते परंतु अर्धलंबगोल आकारातील यंत्र वापरण्यासाठी जास्त सोयीचे पडते. लोखंडी पाइप, बांबू किंवा लाकडाचा सांगाडा तयार करून त्यावर पॉलिशीट लावली जाते.

सौरऊर्जेचा वापर वाळविण्यासाठी होतो त्यामुळे वीज बिलाचा खर्च येत नाही. ढगाळ वातावरण असेल तरी आतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त असते.

एकदा बसवलेली पॉली फिल्म चार-पाच वर्षे टिकते. घरचेच लोक देखभाल, दुरुस्ती करू शकतात.

Polytunnel Dryer
Agriculture Spraying Technology : फवारणीचे प्रकार, पद्धती अन् तंत्रज्ञान

फायदे

पिकाची योग्य वेळी (१० ते १५ दिवस अगोदर) कापणी करता येते. पुढच्या पेरणीचे नियोजन करता येते.

धान्याची प्रत चांगली मिळते.

परतीच्या पावसाने पीक भिजून काळे पडून होणारे नुकसान टळेल.

पक्व पिकाचे पक्षांपासून होणारे नुकसान टळते. केले जाणारे नुकसान टळेल किंवा कमी होईल.

वादळ वाऱ्यामुळे कणसे किंवा पीक जमिनीवर पडून होणारे नुकसान टळेल.

पूर्ण पक्वतेच्या अवस्थेत (१०-१५ दिवस अगोदर) असताना पिकाची काढणी केली तर त्या जमिनीतील ओलाव्यावर रब्बीच्या पिकाचे नियोजन करता येईल.

धान्यातील जलांश ठरावीक पातळीपर्यंत (११-१२ टक्के) आणल्यास धान्य अधिक काळ सुरक्षितपणे साठविता येते.

ड्रायरचे इतर उपयोग

फळे, भाजीपाला सुकविण्यासाठी उपयुक्त.

रानभाज्या तसेच आयुर्वेदिक वनस्पती वाळवणे.

हळद वाळवणे, सुंठ तयार करण्यासाठी आले वाळविणे.

डॉ. कैलास कांबळे, ९४०४७८५८८४

(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com