Loksabha Election : सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत

Election Update : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्के पेक्षा अधिक करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Solapur News : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्के पेक्षा अधिक करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि मतदानाची टक्केवारी ७५ टक्के पेक्षा अधिक होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले.

Loksabha Election
Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात नव्याने १६९ मतदान केंद्रे वाढली

लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलिस शहर उप आयुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम म्हणाले, आपले राज्य सर्व क्षेत्रात देश पातळीवर अग्रेसर आहे. परंतु मतदानाच्या टक्केवारीत इतर राज्याच्या तुलनेत व राष्ट्रीय सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी आहे. तरी सर्व यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे, अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

Loksabha Election
Loksabha Election Boycott : बाळगंगा धरणग्रस्‍तांचा मतदानावर बहिष्‍कार!

मतदानाची टक्केवारी जास्त होणाऱ्या मतदान केंद्रासाठी स्पर्धा ठेवावी, मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेटिंग रूम करून टोकन सिस्टीम प्रमाणे मतदानासाठी बोलवावे, असेही त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाची तयारी व्यवस्थित झालेली असून, याच पद्धतीने पुढेही काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन श्री. चोकलिंगम यांनी केले.

मतमोजणी केंद्र, नियंत्रण कक्षाला भेट

मतदानानंततर सर्व ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केली. तसेच नियोजन भवन येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षालाही चोकलिंगम यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षा कडून निवडणूक विषयक करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com