Rural Housing Scheme : अहिल्यानगरमध्ये नव्याने होणार ८३ हजार घरकुले

PM Awas Scheme : पंतप्रधान घरकुल योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या आता दुसऱ्या टप्प्यात ८२ हजार ९७६ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करून त्या घरकुलांना मंजुरी दिली आहे.
Pm Awas Yojana
PM Rural Housing Scheme Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : पंतप्रधान घरकुल योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या आता दुसऱ्या टप्प्यात ८२ हजार ९७६ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करून त्या घरकुलांना मंजुरी दिली आहे. मंजूर केलेली सर्व घरकुले पूर्ण केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५५ हजार ४९५ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून त्याचा ताबा सबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.

ग्रामीण भागात गरीब, घरे नसलेल्या कुटुंबाला पंतप्रधान घरकुल योजनेतून घरे मिळावीत यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागासाठी यंदा पंतप्रधान घरकुल योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या टप्प्यात ८२ हजार ९७६ घरे बांधण्याचे उद्दिष्ठ ठेवले असून त्या सर्व लाभार्थ्यांच्या सर्व घरांना मंजुरी दिली आहे.

Pm Awas Yojana
Pm Housing Scheme : अहिल्यानगरला पहिल्या टप्प्यात ५५,४०० घरकुले पूर्ण

घरकुल योजनेतून जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी आणि ती दर्जेदार व्हावीत यासह घरकुल मंजूर होऊनही जागा नसल्याने घरापासून वंचित राहत असलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. घरकुल मंजूर झाले परंतु घर बांधण्याला जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली जात आहे.

राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यात गावठाणाचा विस्तार करून जागा उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावठाण विस्तारीत प्रस्ताव मंजूर करून घेण्याबरोबरच गायरानातील घरकुले नियमित करून घेण्यासाठी विशेष मोहीम आखण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

Pm Awas Yojana
PM Housing Scheme : सोलापुरात ६२ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वितरण

पंतप्रधान घरकुल योजनेतून घरे उभारणी करताना घरांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रयत्न केली जात आहेत. लाभार्थ्यांनी दर्जेदार घर कसे उभारावे, याबाबत मार्गदर्शन व्हावे म्हणून घरकुलाच्या १५ डेमो घरांची जिल्ह्यात उभारणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उद्दिष्ठ निश्चित केलेल्या घरकुलांना मंजुरी दिलेली आहे.

तालुकानिहाय होणारी घरकुले

अकोले ः १३,६६४, जामखेड ः ४,०९०, कर्जत ः ६,२५८, कोपरगाव ः ५,०८६, अहिल्यानगर ः ४,४५०, नेवासा ः ७,२४१, पारनेर ः ४,१२३, पाथर्डी ः ५,७३२, राहाता ः ३,७६९, राहुरी ः ५,१४५, संगमनेर ः ९,१७९, शेवगाव ः ५,६८८, श्रीगोंदा ः ३,८३८, संगमनेर ः ४,५१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com