Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय; मतमोजणी सुरू

Ajit Pawar Election : या कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनेल्स रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना हे स्वतंत्र पॅनेल घेऊन मैदानात उतरले आहेत.
Ajit pawar
Ajit pawarAgrowon
Published on
Updated on

Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज (ता.२४) पार पडत आहे. यामध्ये पहिलाच निकाल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूने लागला आहे. ‘ब’ वर्गातून अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. एकूण १०२ मतांपैकी १०१ मतं वैध ठरली आहेत. त्यामधून अजित पवारांना तब्बल ९१ मते मिळाली आहेत. या गटात सहकारी संस्था मतदान करतात.

या कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनेल्स रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना हे स्वतंत्र पॅनेल घेऊन मैदानात उतरले आहेत.

Ajit pawar
Ajit Pawar Audit: उपमुख्यमंत्री पवार ॲक्शन मोडवर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटनेचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी एकूण चार पॅनेल्स यावेळी समोरासमोर आहेत.

कारखान्याच्या एकूण मतदारांची संख्या १९ हजार ५४९ इतकी असून यामध्ये ८८.४८ टक्के मतदान झालं आहे. यापैकी १२ हजार ८६२ पुरुष आणि ४ हजार ४३४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १७ हजार २९६ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. ‘ब’ प्रवर्गात तर ९९.०२ टक्के मतदानाची नोंद झाली असून १०२ मतदारांपैकी ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी मतदान केलं आहे.

या निवडणुकीत ९० उमेदवार रिंगणात असून एकूण २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. पहिल्या फेरीतच अजित पवारांनी विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. ब वर्गातील मतमोजणीत ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते आणि अखेर त्यांनी ९१ मतांच्या जोरावर निर्णायक विजय मिळवला.

Ajit pawar
Sugar MSP : साखरेच्या किमान विक्री किमतीत केंद्राकडून वाढ करणे गरजेचे

या विजयामुळे माळेगाव कारखान्याच्या सत्तेच्या दिशेने अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने जोरदार पाऊल टाकले आहे. आता पुढील मतमोजणीतील निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com